Join us  

ना मावा, ना कन्डेंस मिल्क; फक्त ३ ब्रेड स्लाईसचे करा गारेगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:13 AM

How to Make Bread Ice Cream Recipe : मावा, कडेंस मिल्क, दूध पावडर असं कोणतंही  साहित्य ही आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणार नाही.

उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून आणून खाणं प्रत्येकवेळी शक्य होतच असं नाही. काहीजण दुपारी तर काहीजण रात्री जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खातात. (How to make ice cream at home) घरी आईस्क्रीम बनवण्याचा एक फायदा असा की कमीत कमी खर्चात भरपूर आईस्क्रीम होतं आणि घरातील मंडळी कधीही पोटभर आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. घरी बनवलेलं असल्यामुळे पौष्टीकही तितकंच असते. (Bread Icecream at home)

मावा, कडेंस मिल्क, दूध पावडर असं कोणतंही  साहित्य ही आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणार नाही. चहाबरोबर खाण्यासाठी किंवा सॅण्डविचसाठी ब्रेड आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो. फक्त ३ ते ४ ब्रेड स्लाईस वापरून हे चवदार आईस्क्रीम तयार होईल.(Easy and quick icecream recipe)

१) ब्रेड आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात आधी ३ ब्रेड घेऊन त्याच्या कडा काढून घ्या आणि ब्रेडचा पांढरा भाग मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता एकत्र करून मिस्करमधून बारीक करून घ्या.

चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

२) एका कढईत अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवा. दूधाला उकळ फुटल्यानंतर  त्यात चिमुटभर केशर, वेलची पूड, साखर आणि ड्राय फ्रुट्सची पावडर आणि ब्रेडचा चुरा घालून दूध सतत ढवळत राहा. दूध घट्ट घाल्यानंतर  गॅस बंद करा. मिश्रण सारख्या आकाराच्या ग्लासात भरून रेफ्रिजरेट करण्यास ठेवा. 

नवीन पद्धतीनं १० मिनिटात करा रवा इडली;  मऊ, फुगणाऱ्या इडल्यांची एकदम सोपी रेसिपी

३) ७ ते ८  तासांनी  हे ग्लास फ्रिजमधून बाहेर काढा. एक लाकडाची आईस्क्रीम स्टीक घालून आईस्क्रीम बाहेर काढा आणि सुरीच्या साहाय्यानं गोल-गोल कापून घ्या. वरून पिस्त्याचे लहान तुकडे आणि  खाण्यायोग्य सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला. तयार आहे होममेड ब्रेड आईस्क्रीम.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स