Lokmat Sakhi >Food > साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार

साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार

How to Make Breakfast from Sabudana without Soaking : सगळ्यात आधी एका सॅण्डविच मेकरमध्ये  कच्चे न भिजवलेले साबुदाणे, शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:47 PM2023-08-10T15:47:53+5:302023-08-10T16:49:47+5:30

How to Make Breakfast from Sabudana without Soaking : सगळ्यात आधी एका सॅण्डविच मेकरमध्ये  कच्चे न भिजवलेले साबुदाणे, शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घ्या.

How to Make Breakfast from Sabudana without Soaking : What can be made from without Soaking soaked sabudana | साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार

साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार

अधिक मास आणि श्रावणात बरेच लोक उपवास करतात. अशावेळी साबुदाणे, बटाटे असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Cooking Hacks) साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे हे पदार्थ सकाळच्या आहारासाठी आणि दुपारच्या फराळासाठी बनवले जातात. पण जर आदल्या दिवशी साबुदाणे भिजवले नसतील तर ऐनवेळी काय बनवावं सुचत नाही अशावेळी साबुदाणे न भिजवताच टेस्टी नाश्ता बनवला तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. (How to Make Breakfast from Sabudana without Soaking)

१) सगळ्यात आधी   कच्चे न भिजवलेले साबुदाणे, शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घ्या.  कढईतही तुम्ही हे पदार्थ भाजू शकता. भाजल्यानंतर यात आलं घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. तयार पेस्टमध्ये उकडलेला बटाटा किसून घाला. 

२) यामध्ये मीठ, जीरं, कोथिंबीर घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर सॅण्डविच मेकरला तेल लावून त्यात हे मिश्रण पसरवा आणि गरम होण्यासाठी ठेवा. ५ ते १० मिनिटांनी तयार झालेले सॅण्डविच बाहेर काढून घ्या. हेच मिश्रण तुम्ही भजी किंवा वड्यांच्या आकाराप्रमाणे तेलात सोडून  कुरकुरीत पदार्थ बनवू शकता.  

साबुदाणे खाण्याचे फायदे

१) साबुदाणे खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन वाढते. जर तुमचं शरीर जास्त सुकडे असेल तर तुम्ही आहारात साबुदाण्यांचा समावेश करू शकता. ज्यामुळे शरीर सुडौल राहते. 

२) रोज साबुदाणे खाल्ल्यानं हाडं मजबूत राहतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडांचा विकास होतो. साबुदाण्यांमध्ये आर्यनचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे हाडांचा विकास होतो आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.

३) हाय ब्लड प्रेशरच्या समस्येला दूर ठेवण्यासाठी साबुदाण्यांचा आहारात समावेश करा. यात फायबर्स, फॉस्फरेस, पोटॅशियम  असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. याशिवाय शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीसुद्धा कमी होते. 

४) साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो. यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. यासोबतच मेंदूचे विकार दूर करण्यातही हे गुणकारी आहे.

Web Title: How to Make Breakfast from Sabudana without Soaking : What can be made from without Soaking soaked sabudana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.