Join us  

वांग्याचं भरीत-भाजी नेहमीचीच, करून पाहा क्रिस्पी वांग्याची भजी, सोपी रेसिपी स्नॅक्ससाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 12:04 PM

How to make Brinjal Fritters with easy tips : जेवताना ताटात हवीच वांग्याची भजी, चवीला भारी-करायला सोपी

पावसाळा, हिवाळा असो किंवा उन्हाळा. प्रत्येक ऋतूत आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भजी. जेवणासोबत अनेकांना भजी खायला आवडते, किंवा काही लोकं वाफाळलेल्या चहासोबत भजीचा आस्वाद घेतात. भजी अनेक प्रकारचे केले जातात. बटाटा, कांदा, भेंडी, कोबी असे अनेक प्रकारचे खमंग कुरकुरीत भजी आवडीने खाल्ले जातात.

पण आपण कधी वांग्याची भजी ट्राय करून पाहिली आहे का? वांग्याची भाजी, आमटी, भरीत तर आपण खाल्लंच असेल. पण आता वांग्याची भजी ट्राय करून पाहा. वांग्याची कुरकुरीत भजी करायला सोपी, व कमी साहित्यात तयार होते. वांग्याची भजी कशी तयार करायची पाहूयात(How to make Brinjal Fritters with easy tips).

वांग्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

वांगी

बेसन

तांदुळाचं पीठ

कलौंजी

ना डाळ भिजवण्याचं टेन्शन, ना आंबवण्याचा त्रास, करून पाहा मसूर डाळीचा पौष्टीक डोसा झटपट

खसखस

लाल तिखट

हळद

पाणी

बेकिंग सोडा

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या, त्यात अर्धा कप तांदुळाचं पीठ, एक चमचा कलौंजी, अर्धा चमचा खसखस, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद व पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण भज्यांसाठी बॅटर तयार करतो, त्याचप्रमाणे बॅटर तयार करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.

शिळी चपाती आणि उकडलेला बटाटा, ‘असा’ क्रिस्पी-कुरकुरीत चपाती रोल, चमचमीत रेसिपी

एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा मीठ घाला. नंतर वांग्याचे जाडसर काप करून घ्या, व वांग्याचे काप त्या पाण्यात काही वेळासाठी घालून ठेवा. जेणेकरून वांग्याचे काप काळपट पडणार नाही. बॅटरमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. बॅटरमध्ये वांग्याचे काप बुडवून गरम तेलात सोडा. सोनेरी रंग येईपर्यंत भजी तळून घ्या. अशा प्रकारे वांग्याची भजी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स