Join us  

श्रावण उपवास स्पेशल ; शिंगाड्याच्या पिठाची खुसखुशीत भजी! पौष्टिक- चविष्ट आणि पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2022 6:54 PM

श्रावणात संध्याकाळच्या चहासोबत करा (how to make buckwheat pakode) शिंगाड्याच्या पिठाची भजी; चवीला मस्त आणि आरोग्यासाठी फायदेशीर

ठळक मुद्देशिंगाड्याचं पीठ आणि त्याचे पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ पचनास सुलभ असतात.उपवासाच्या दिवशी शरीराला आवश्यक ऊर्जा शिंगाड्याच्या पिठाच्या पदार्थातून मिळते.

पावसाळ्याच्या दिवसात भजी खावीशी वाटतातच. पण नेहमीच काय बटाटा, कांद आणि मूग भजी. आता श्रावण सुरु आहे. श्रावण म्हणजे उपवासांचा महिना. उपवासाचे दिवस म्हटले की तोंड बांधलेलं. चटक मटक खाण्यावर बंदी. पण उपवासाला खाता येतील असे चटपटीत पदार्थ माहित असल्यास उपवासालाही चटकदार पदार्थ करता येतील. उपवासाचे साबुदाणा वडे आपण उपवासाला काय एरवीही खातोच. तसेच उपवासाची भजी (pakode for fast)  हा देखील प्रकार आहे. जे उपवासाला तर खाता येतातच पण एरवीही पावसाळ्याच्या दिवसात भजींची लहर भागवण्यासाठी करता येतात. शिंगाड्याचं पीठ आणि शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ (buckwheat for fast) हे उपवासासाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी प्रकार आहे. शिंगाड्याच्या पिठापासून मस्त भजी (buckwheat pakode)  देखील करता येतात उपवासासाठी शिंगाड्याच्या पिठाच्या भजी करण्यासाठी (how to make buckwheat pakode)  शिंगाड्याचं पीठ आणि बटाटे यांचीच गरज असते. अवघ्या 20 मिनिटात शिंगाड्याची भजी तयार होतात. शिंगाड्याची भजी केवळ चवीसाठीच खावी असं नाही तर आरोग्यासाठीही ही भजी (healthy buckwheat pakode)  पौष्टिक असतात. 

Image: Google

शिंगाड्याच्या पिठाची भजी कशी कराल?

शिंगाड्याच्या पिठाची भजी करण्यासाठी पाऊण कप शिंगाड्याचं पीठ, 2-3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा आलं, चवीनुसार सैंधव मीठ, पाव चमचा लिंबाचा रस, 2 छोटे बटाटे, थोडी पुदिन्याची पानं आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी या सामग्रीची आवश्यकता असते. 

शिंगाड्याच्या पिठाची भजी करताना आधी बटाटे नरम उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे गार झाल्यावर त्याची सालं काढून हातानं कुस्करुन घ्यावेत. एका मोठ्या भांड्यात कुस्करलेला बटाटा, शिंगाड्याचं पीठ आणि  मिरच्या बारीक चिरुन किंवा वाटून, आलं किसून घालावं. हे सर्व साहित्य नीट मिसळून घ्यावं. त्यात थोडं थोडं पाणी घालून मिश्रण पिठासारखं मळावं. हे पीठ मळल्यानंतर लगेच भजी करावीत. नाहीतर पिठाला जास्त पाणी सुटतं.

Image: Google

पिठाचे छोटे छोटे गोळे करुन गरम तेलात ते तळून घ्यावेत. ही भजी पुदिन्याच्या चटणीसोबत छान लागतात. पुदिन्याची चटणी करण्यासाठी पुदिन्याची पानं, अर्धा चमचा जिरे, आंबट चव येण्यासाठी 2-3 आमसूल थोडं सैंधव मीठ घालावं. पाणी घालून चटणी वाटून घ्यावी. या चटणीत थोडं लिंबू पिळलं तरी चालतं.शिंगाड्याच्या पिठाची खमंग भजी पुदिन्याच्या चटपटीत चटणीसोबत छान लागतात.

Image: Google

शिंगाड्याच्या पिठाचे भजी पौष्टिक असतात कारण..

1. शिंगाड्याच्या पिठात प्रथिनं असतात. यात उष्मांक नसल्याने शिंगाड्याच्या पिठाची भजी सहज पचतात. शिंगाड्याचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. शिंगाड्याच्या पिठातील घटकांमुळे चयापचय क्रिया गतीशील होते. शिंगाड्याच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं शिंगाड्याच्या पीठ आणि त्याचे पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. 

2. शिंगाड्याच्या पिठातील गुणधर्म शरीरावरील सूज कमी करण्यास सहाय्यभूत ठरतात. शरीरातील कोलेस्टेराॅल कमी होतं.  या पिठात फायटोन्यूट्रीइंट आणि ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी आणि कोलेस्टेराॅल कमी करण्यास मदत करतात. 

3. शिंगाड्याच्या पिठात फायबरचं प्रमाण चांगलं असल्यानं पचन तंत्र सुधारतं. अपचन, आतड्यांचे विकार होत नाही. उपवासाच्या काळात शरीर -मनाला ऊर्जा देण्यासाठी शिंगाड्याचं पीठ आणि त्याचे पदार्थ फायदेशीर ठरतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.