सकाळच्या नाश्त्याला आपण अनेकदा डोसा, इडली, मेदू वडा असे दाक्षिणात्य (Instant Breakfast Bun Dosa Reciep) पदार्थ तयार करतो. यातही अनेकदा डोसा आणि डोशाचे (How To Make Bun Dosa At Home) वेगवेगळे प्रकार अगदी आवडीने खाल्ले जातात. डोसा करायचं म्हणलं की पीठ दळणं, आंबवणं सगळं काही करावं लागतं. परंतु जर आपल्याला इतकं सगळं सकाळच्या घाईगडबडीत करायला वेळ नसेल तर आपण अगदी झटपट तयार होणारा इन्स्टंट असा 'बन डोसा' घरच्याघरीच पटकन तयार करु शकतो( Soft & Spongy Bun Dosa Recipe).
डोसा म्हटलं की आपल्याला एकदम पातळ गोलाकार असा डोसा डोळ्यांसमोर येतो. परंतु हा 'बन डोसा' नेहमीच्या डोशापेक्षा थोडा वेगळा असतो. हा 'बन डोसा' गोलाकार, सॉफ्ट आणि थोडा जाडसर, फुगलेला असा असतो, दिसायला अगदी एखाद्या बनपावाप्रमाणेच दिसतो म्हणून याला 'बन डोसा' असे म्हटले जाते. जर आपल्याला नेहमीचा तोच तो डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर आपण सकाळच्या नाश्त्याला इन्स्टंट तयार होणारा हा 'बन डोसा' करु शकतो. 'बन डोसा' (Bun Dosa) घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. रवा - १ कप
२. दही - १ कप
३. पाणी - गरजेनुसार
४. तेल - २ टेबलस्पून
५. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून
६. मोहरी - १ टेबलस्पून
७. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
८. कांदा - १ (बारीक चिरलेला)
९. कडीपत्ता - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
१०. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
११. मीठ - चवीनुसार
१२. इनो - १ टेबलस्पून
मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...
तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसतात? २ ट्रिक्स, चटके न बसता वळा एका आकाराचे परफेक्ट लाडू...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात बारीक रवा, दही आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सर फिरवून बॅटर तयार करून घ्यावे.
२. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.
३. त्यानंतर एका छोट्या गोलाकार तडका पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात पांढरी उडीद डाळ, मोहरी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही तयार गरम फोडणी डोसा बॅटर मध्ये ओतून घ्यावी.
मुलांची छोटी भूक, खाऊच्या डब्यासाठी कुकरमध्ये करा इराणी स्टाईल स्पॉंजी मावा केक...
४. त्यानंतर या डोसा बॅटरमध्ये बारीक चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
५. सगळ्यात शेवटी या तयार बॅटरमध्ये इनो आणि त्यावर चमचाभर पाणी घालून सगळे बॅटर चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे.
६. मग एक छोटा खोलगट तडका पॅन घेऊन त्यात थोडेसे तेल लावून त्यावर हे डोसा बॅटर घालून डोसा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून नेहमीपेक्षा थोडा जाडसर पण सॉफ्ट आणि स्पॉंजी डोसा तयार करून घ्यावा.
आपला बन डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा तयार बन डोसा मस्त हिरव्यागार चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.