Join us  

कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 3:45 PM

How to Make Bundi Ladoo Recipe At Home : हलवाईसारखे बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी, यंदाच्या दिवाळीत नक्की बनवून पहा...

दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या फराळात लाडूचा विशेष मान असतो. मग तो लाडू कोणताही असो, तो तितक्याच आवडीने खाल्ला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रांत दिवाळीच्या (Diwali Festival Special Bundi Ladoo Recipe) सणाला बेसनाचे, रव्याचे, मोतीचूर, बुंदीचे (Perfect Boondi ladoo Indian Sweet) असे अनेक प्रकारांतील लाडू बनतात. काहीवेळा फराळाचे ताट पुढे केले असता आपण हमखास त्यातला लाडूच आधी उचलतो. खरंतर सणासुदीचे दिवस सुरु झाले की स्पेशल रेसिपीज बनवण्याची आपली जुनी परंपरा आहे. प्रत्येक सणानुसार त्या त्या दिवसाची अशी एक स्पेशल रेसिपी असते. या सगळ्या सणांमध्ये दिवाळी हा महत्वाचा सण. या सणानिमित्ताने आपण घरी लाडू, चिवडा, करंजी, शेव, चकली, शंकरपाळे असे अनेक पदार्थ फराळ म्हणून बनवतो(Boondi Ladoo Recipe).

फराळाच्या ताटातील लाडू म्हटलं की आपल्याला सर्वात आधी बेसन व रवा लाडूच आठवतात. परंतु जर आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवलं तर या बेसन, रव्याच्या लाडूंना बुंदीचा लाडू हा उत्तम पर्याय असू शकतो. बेसन, रव्याच्या लाडू सारखा बुंदीचे लाडू बनवण्यासाठी मोठा घाट घालावा लागत नाही. ना बेसन, रवा भाजण्याचे टेंन्शन ना लाडू बिघडण्याची भीती. झटपट बुंदी पाडून आपण हे लाडू घरच्या घरी तयार करु शकतो. दिवाळीला रोजचे तेच ते बेसन किंवा रवा लाडू करण्यापेक्षा यंदाच्या दिवाळीत फराळासाठी बुंदीचे लाडू नक्की ट्राय करून पहा. बुंदीचे लाडू कसे बनवावेत याची सोपी रेसिपी पाहूयात(How to Make Bundi Ladoo Recipe At Home).

साहित्य :- 

१. बेसन - २५० ग्रॅम २. पाणी - १.५ कप ३. ऑरेंज किंवा पिवळा फुड कलर - १/२ टेबलस्पून ४. तेल - तळण्यासाठी५. साखर - १ कप ६. वेलचीपूड - १ टेबलस्पून ७. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ८. मगज बिया - २ टेबलस्पून 

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

कृती :- 

१. सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन व गरजेनुसार पाणी घेऊन त्याची मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करून घ्यावी. २. आता या तयार मिश्रणात आपल्या आवडीनुसार ऑरेंज किंवा पिवळा फूड कलर घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे. ३. त्यानंतर एका मोठ्या कढईत तेल तापवून घ्यावे. तेल तापल्यावर त्यावर तळणाचा झारा धरून त्यातून हे मिश्रण ओतावे. यामुळे आपल्याला गोलाकार बुंदी पाडण्यास मदत होते. 

करंजीचं सारण सैल किंवा कोरडं होतं ? घ्या सोपी रेसिपी, महिनाभर टिकतील करंज्या, सारणही होणार नाही खवट...

मार्केट सारखी खमंग, कुरकुरीत, मसाला शेव बनवण्याची सोपी रेसिपी, चव अशी की शेव होईल फस्त...

४. ही बुंदी गरम तेलात १० ते १५ सेकंदात माध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यावी. ५. दुसरीकडे, एका भांड्यात साखर घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यावा. ६. पाक तयार झाल्यावर त्यात चवीनुसार वेलची पूड घालून घ्यावी. ७. चमचाभर तुपात मगज बिया खरपूस भाजून घ्याव्यात. ८. तयार केलेल्या साखरेच्या पाकात तळून घेतलेली बुंदी व मगज बिया घालून, बुंदी नरम होण्यासाठी २० ते २५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवले पाहिजे. ९. बुंदी पाकात बुडून व्यवस्थित नरम झाल्यावर या मिश्रणाचे गोलाकार लाडू वळून घ्यावेत. 

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

आपल्या आवडीनुसार आपण या लाडूवर ड्रायफ्रुट्सचे काप किंवा चांदीचा वर्ख लावून सजवू शकतो. आपले बुंदीचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृती