Lokmat Sakhi >Food > पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश

पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश

Quick Recipe of Biscuit Barfi: पावसाळ्यात बऱ्याचदा बिस्किटे सादळून जातात. अशी बिस्किटे फेकून देऊ नका. कारण त्यांच्यापासून अगदी १५ ते २० मिनिटांतच चवदार बर्फी तयार करता येते.(How to make burfi from leftover biscuits?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 12:27 PM2023-08-26T12:27:55+5:302023-08-26T12:31:32+5:30

Quick Recipe of Biscuit Barfi: पावसाळ्यात बऱ्याचदा बिस्किटे सादळून जातात. अशी बिस्किटे फेकून देऊ नका. कारण त्यांच्यापासून अगदी १५ ते २० मिनिटांतच चवदार बर्फी तयार करता येते.(How to make burfi from leftover biscuits?)

How to make burfi from leftover biscuits? Biscuit barfi recipe in just 20 minutes, best use of leftover biscuits | पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश

पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश

Highlightsबिस्किटांच्या मदतीने इतकी चविष्ट बर्फी तयार करता येते की तिच्यासमोर दुकानातली महागडी मिठाईही चवीच्या बाबतीत फिकी पडते.

पावसाळ्यात बिस्किटाचा डबा चुकून थोडासा जरी उघडा राहीला किंवा बिस्किटांचा पुडा तसाच बाहेर ठेवला गेला, तर ती बिस्किटे हमखास सादळून जातात. अशी ओलसर, मऊ पडलेली बिस्किटे मग अजिबातच खावी वाटत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा मग ती टाकूनच दिली जातात. पण आता मात्र सादळलेल्या बिस्किटांचा कसा चवदार उपयोग करायचा, ते पाहून घ्या (best use of leftover biscuits). या बिस्किटांच्या मदतीने इतकी चविष्ट बर्फी तयार करता येते की तिच्यासमोर दुकानातली महागडी मिठाईही चवीच्या बाबतीत फिकी पडते. त्यामुळेच बिस्कीट बर्फी करण्याची ही रेसिपी एकदा बघूनच घ्या.( Biscuit barfi recipe in just 20 minutes)

 

कशी तयार करायची बिस्कीट बर्फी?
साहित्य

पाव लीटर दूध

२५ ते ३० बिस्किटे

६ टेबलस्पून साखर

माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

२ टीस्पून वेलची पावडर

२ टेबलस्पून तूप

२ टेबलस्पून काजू, बदाम, पिस्ता यांचे काप

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दूध उकळायला ठेवा. आपल्याला दूध थोडे आटवून घ्यायचे आहे. साधारण आटून दूध निम्मे होईल, इथपर्यंत ते उकळावे.

बाथरुममध्ये सतत कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, दुर्गंध गायब- बा‌थरुम कायम राहील सुगंधी- स्वच्छ

२. आता एकीकडे साखरेचा पाक करून घ्या. यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात साखर घाला. साखर जेवढी असेल, तेवढेच पाणी टाकावे. पाण्यात जेव्हा साखर पुर्णपणे विरघळून जाईल तेव्हा त्यात आटवलेले दूध टाकावे.

 

३. आता या दूधात बिस्किटांचे तुकडे घाला. दूध आणि बिस्किटे एकजीव होईपर्यंत ते मिश्रण हलवत राहा. जेव्हा मिश्रण कढईच्या बाजुने सुटू लागेल आणि त्याचा एक घट्ट असा गोळा तयार होऊ लागेल, तेव्हा त्यात थोडे तूप, वेलची पावडर सोडा. मिश्रण खूपच घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.

श्रावण शुक्रवारी का खायचे गूळ-फुटाणे? परंपरेतून मिळतील ५ फायदे, लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ!

४. आता गॅस बंद करा. एका ताटलीला तूप लावा. त्यात आपण तयार केलेला गोळा ठेवा आणि ताटलीभर समप्रमाणात पसरवून घ्या. त्यावर छानपैकी सुकामेवा पेरा. आता ही ताटली एखादा तास तशीच ठेवून थंड होऊ द्या. नंतर त्याचे काप करा. चविष्ट अशी बिस्कीट बर्फी तयार. 

Web Title: How to make burfi from leftover biscuits? Biscuit barfi recipe in just 20 minutes, best use of leftover biscuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.