Join us  

थंडीच्या दिवसांत लोणी निघायला वेळ लागतो? १ सोपी ट्रिक, ताक घुसळताना १० मिनीटांत निघेल लोणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 2:51 PM

How To Make Butter In Winter Season : थंडीच्या दिवसांत लोणी लवकर निघत नसेल तर ट्राय करा सोपा उपाय

ठळक मुद्देलोणी करणे सोपे असले तरी थंडीच्या दिवसांत लोणी लवकर निघत नाहीस्वयंपाकघरातील काम झटपट आणि कमीत कमी वेळात व्हावे यासाठी

आपण दररोजच्या दुधावर आलेली साय किंवा मलाई बाजूला काढतो. ८ किंवा १५ दिवसांची साय साठली की त्यामध्ये विरजण लावतो आणि मग त्या सायीचं लोणी करतो. या लोण्यापासून तयार झालेलं रवाळ तूप आपण वेगवेगळ्या पदार्थांवर घेण्यासाठी वापरतो. विरजण लावणं, त्याचं लोणी करणं आणि तूप कढवणं ही एरवी अतिशय सोपी वाटणारी गोष्ट पण थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने दही लवकर विरजत नाही. इतकंच नाही तर सायीचं लोणी निघायलाही खूप वेळ लागतो (How To Make Butter In Winter Season). 

त्यातही आपण साध्या रवीने लोणी करत असू तर हात दुखेपर्यंत रवी फिरवत बसावी लागते. इतकंच नाही तर पूर्ण १ दिवस हे विरजण बाहेर ठेवलं तरी ते लवकर आंबत नाही आणि मग लोणी निघायला वेळ लागतो. त्यासाठीच थंडीच्या दिवसांत लवकर लोणी निघावं यासाठी एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ पूनम देवनानी ही ट्रिक आपल्याशी शेअर करत असून त्यामुळे आपलं काम काही प्रमाणात सोपं होण्याची शक्यता आहे. 

१. आपण साधारणपणे दही फ्रिजमधून बाहेर काढतो आणि ते इलेक्र्टीक रवी किंवा साध्या रवीने फिरवायला घेतो. 

२. त्यापेक्षा एका पसरट भांड्यात गरम पाणी घ्यायचे. आणि दही काढलेले पातेले गरम पाण्यात ठेवायचे. दही जास्त थंड असेल तर लोणी निघायला वेळ लागतो. पण गर्मीमुळे लोणी झटपट वर यायला मदत होते. 

३. काही वेळ हे दही फेटल्यानंतर त्याचे नेहमीपेक्षा कमी वेळात लोणी तयार झालेले आपल्याला दिसेल. 

४. मग यामध्ये पाणी घालायचे आणि एक गाळणी घेऊन हे मिश्रण गाळून घ्यायचे. त्यामुळे त्यातील अनावश्यक भाग खाली जाऊन घट्टसर लोणी गाळणीत जमा होईल. 

५. मग हे लोणी एका पातेल्यात घेऊन ते कढवायचे, त्याचे मस्त तूप तयार होते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती