Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...

घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...

How to Make Theater-Worthy Popcorn with Aluminum Foil : popcorn at home using aluminium foil : विकतसारखे आवडते पॉपकॉर्न झटपट तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2024 07:35 PM2024-08-29T19:35:57+5:302024-08-29T19:52:10+5:30

How to Make Theater-Worthy Popcorn with Aluminum Foil : popcorn at home using aluminium foil : विकतसारखे आवडते पॉपकॉर्न झटपट तयार!

how to make buttered popcorn with aluminum foil HOW TO MAKE POPCORN IN FOIL SIMPLY AND EASY WAY | घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...

घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...

मस्त गरमागरम, पिवळे - पांढरे, खारट, तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न खायला कुणाला नाही आवडत. पॉपकॉर्न हा स्नॅक्सचा असा एक प्रकार आहे जो जगभर अतिशय प्रसिद्ध आहे. पॉपकॉर्न म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खायला आवडतात. थेटरमध्ये सिनेमा पाहताना पॉपकॉर्न नसेल तर मजा येत नाही. चित्रपटगृह, जत्रा किंवा रस्त्यावर पॉपकॉर्नचा (Popcorn) वास तुम्हाला ते खायला भाग पाडतो. कदाचित याच कारणामुळे पॉपकॉर्न हा जगात सर्वाधिक खाल्ला जाणारा स्नॅक्सचा प्रकार आहे(HOW TO MAKE POPCORN IN FOIL SIMPLY AND EASY WAY).

बाहेर विकत मिळणारे हे पॉपकॉर्न आपण काहीवेळा घरी देखील तयार करतो. घरच्या घरी पॉपकॉर्न करताना आपल्या काही मोजकेच साहित्य लागते, आणि या अतिशय कमी साहित्यात पॉपकॉर्न चटकन तयार होऊन खाण्यासाठी रेडी असतात. घरी पॉपकॉर्न (popcorn at home using aluminium foil) करायचे म्हटलं की आपण मक्याचे दाणे एका मोठ्या भांड्यात घेऊन ते भांडे झाकून गॅसवर ठेवतो किंवा सरळ प्रेशर कुकरचा वापर करुन पटकन पॉपकॉर्न तयार करतो. परंतु सध्या सोशल मिडीयावर हे पॉपकॉर्न तयार करण्याची एक भन्नाट ट्रिक व्हायरल होत आहे. कोणत्याही भांड्याच्या किंवा प्रेशर कुकरचा वापर न करता फक्त अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या (The Secret to Perfect Homemade Popcorn Is Aluminum Foil) छोट्याशा तुकड्याचा वापर करुन हे पॉपकॉर्न चटकन रेडी करु शकतो. पॉपकॉर्न तयार करण्याची ही व्हायरल ट्रिक नेमकी कोणती आहे ते पाहूयात(how to make buttered popcorn with aluminum foil).

साहित्य :- 

१. अ‍ॅल्युमिनियम फॉईल - २ आयताकृती तुकडे  
२. मक्याचे दाणे - १ कप
३. बटर - १ टेबलस्पून 
४. रोजच्या वापरातला तवा  
५. मीठ - चवीनुसार 

मक्याचे पॉपकॉर्न नेहमीचे ! पौष्टिक हवं तर करा चटपटीत, ज्वारी पॉपकॉर्न, पावसांत चविष्ट कर्रकुर्रम... 


कपभर मक्याच्या दाण्यांचे करा फ्लेवर्ड पॉपकॉर्न, ५ मिनिटांत विकतसारखे चटपटीत पॉपकॉर्न तयार... 

कृती :- 

१. एक तवा घेऊन तो गॅसच्या मंद आचेवर गरम करत ठेवावा. 
२. अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे दोन समान आकाराचे आयताकृती तुकडे कापून घ्यावेत. 
३. तवा ५ मिनिटे व्यवस्थित गरम करुन प्री - हिट करुन घ्यावा. 

४. अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा एक तुकडा घेऊन त्यात मक्याचे दाणे, बटर, चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा दुसरा तुकडा घेऊन पहिल्या तुकड्यावर अलगद ठेवून चारही बाजुंनी पेपर व्यवस्थित गुंडाळून अ‍ॅल्युमिनियम फॉईल बंद करुन घ्यावी. त्यानंतर कातर किंवा सुरीच्या मदतीने या अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या बरोबर मधोमध एक छोटेसे छिद्र पाडून घ्यावे. 
५. त्यानंतर ही अ‍ॅल्युमिनियम फॉईल उचलून गरम तव्यावर ठेवून द्यावी. ५ ते ७ मिनिटे तव्यावर ठेवल्यानंतर हे पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार असतील. 
६. अ‍ॅल्युमिनियम फॉईल उघडून हे तयार पॉपकॉर्न खाण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावेत. 

कुकरचा किंवा कोणत्याही भांड्याचा वापर न करता पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत.


Web Title: how to make buttered popcorn with aluminum foil HOW TO MAKE POPCORN IN FOIL SIMPLY AND EASY WAY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.