Join us  

एक कप चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 3:15 PM

How to Make Cabbage Vada Recipe : कोबीची भजी, वडी, पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर, यंदा कोबीचे क्रिस्पी वडे करून पाहा.

हिवाळा (Winter season Food) ऋतू सुरु झाला की अनेकांना चमचमीत पदार्थ खाण्याचे वेध लागते. वडे, भाजी, वडी, यासह इतर क्रिस्पी पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. हवेतील गारव्यासोबत खायला क्रिस्पी पदार्थ असतील, तर साहजिक पोटात २ घास एक्स्ट्रा जातात. वड्याचे अनेक प्रकार केले जातात.

जर आपल्याला बटाटा वडा किंवा कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर, कोबीचे वडे (Cabbage Vada) करून पाहा. कोबीची भाजी, पराठा आपण खाल्लंच असेल, पण यंदा कोबीचे वडे करून पाहा. कोबी खाण्याचे अनेक फायदे आहेत (Cooking Tips). त्यामुळे आरोग्याला पौष्टीक आणि चवीला भन्नाट अशी कोबीचे वडे कसे तयार करायचे पाहूयात(How to Make Cabbage Vada Recipe).

कोबीचे कुरकुरीत वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

कोबी

कांदा

हिरवी मिरची

कडीपत्ता

आलं-लसूण पेस्ट

२ कप दूध-२ ब्रेड स्लाईज, गोड खाण्याची इच्छा झाली तर, करा गोड इन्स्टंट रबडी, करायला सोपी आणि चव जबरदस्त

कोथिंबीर

हळद

लाल तिखट

मीठ

ओवा

जिरं

बेसन

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बारीक चिरलेला कोबी, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कडीपत्ता, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमुटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, एक चमचा जिरं, एक कप बेसन आणि एक चमचा गरम तेल घालून साहित्य एकजीव  करा. त्यात पाणी घालू नका. गरज असल्यास एक - दोन चमचे पाणी घाला.

इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवताना घाला २ पांढऱ्याशुभ्र गोष्टी, उडपीस्टाईल परफेक्ट इडली करा घरी

दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कोबीच्या मिश्रणाचे छोटे वडे तयार करून सोडा. वडे मध्यम आचेवर तळून घ्या, जेणेकरून वडे दोन्ही बाजूने क्रिस्पी भाजून तयार होतील. अशा प्रकारे कोबीचे वडे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स