Join us

न थापता करा गरमागरम कोबीच्या कुरकुरीत वड्या, कोबीची भाजी आवडत नाही म्हणणारेही खातील आवडीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 13:12 IST

Easy cabbage vadi recipe step by step: Healthy Maharashtrian snacks for kids lunchbox: Summer special snacks with cabbage: Nutritious Indian snacks for children: गरमागरम कुरकुरीत कोबीच्या वड्या बनवून बघा. चला तर मग पाहूया सोपी आणि हटके रेसिपी

कोबीची भाजी, कोबीची भजी, पराठे, मच्युरिअन, नूडल्स , सॅण्डविच अशा अनेक पदार्थांमध्ये कोबीचा वापर केला जातो.(Easy cabbage vadi recipe step by step) काहींना कोबीची भाजी आवडत नाही पण इतर पदार्थ खायला अधिक प्रमाणात आवडतात.(Maharashtrian steamed snack for hot days) कोबीमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, जीवनसत्त्वासारखे घटक अधिक असतात. यात असणारे पोषक तत्व शरीरासाठी उत्तम आहे,ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. (Homemade cabbage vadi for toddlers and kids)न थापता कोबीच्या कुरकुरीत वडी ट्राय करणार आहोत. जे खायला अगदी छान आणि चविष्ट लागेल. मुले देखील आवडीने खातील.(Authentic Maharashtrian snack with vegetables) सतत मच्युरिअन, भाजी, पराठे खाण्यापेक्षा या गरमागरम कुरकुरीत वड्या बनवून बघा. चला तर मग पाहूया सोपी आणि हटके रेसिपी. 

ना भाजलेलं ना कच्चं, उन्हाळी सुटीत मुलांसाठी करा स्पेशल सॅण्डविच, पौष्टिक आणि चटपटीत

साहित्य 

मिरच्या - १० ते १२लसूण पाकळ्या - ४ ते ५आले - २ ते ३ इंच जिरे - १ चमचा बारीक चिरलेली कोबी - १ मोठी तीळ - १ चमचा मीठ - आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर - १ चमचा हळद - १ चमचा गरम मसाला - १ चमचा तांदळाचे पीठ - १ वाटी बेसनाचे पीठ - १ वाटी कॉनफ्लोर - अर्धी वाटी कोथिंबीर - आवश्यकतेनुसार तेल - तळण्यासाठी 

कृती 

1.  सगळ्यात आधी मिरच्या, लसूण, आले आणि जिरे मिक्समध्ये वाटून पेस्ट तयार करा. 

2. आता बारीक चिरलेली कोबी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पेस्ट घाला. 

3. यामध्ये मीठ, तीळ, मसाले, तांदळाचे, बेसनाचे आणि कॉनफ्लोर पीठ घालून मिक्स करा. 

4. पाणी घालून पीठ मळा. वरुन तेल घालून त्याचे उभे लांब आकार तयार करा. 

5. टोपात पाणी घेऊन मोठ्या चाळणीत हे पीठ वाफवून घ्या. वाफवल्यानंतर सुरीने गोल काप पाडून घ्या. 

6. तेल कडकडीत गरम करुन चांगले तळून घ्या. तयार होईल गरमागरम कुरकुरीत कोबीच्या वड्या...  

टॅग्स :अन्नपाककृती