भारतात जवळपास प्रत्येक घरात सकाळची सुरूवात चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय ताजंतवानं वाटत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं (Chaha Masala). चहा भारतातील एक लोकप्रिय पेय आहे. खासकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चहाशिवाय जमतच नाही. अनेकजण चहाला चव येण्याासठी चहात वेलची किंवा आलं घालतात. तुम्ही यात चुटकीभर चहा मसाला पावडर घातली तरी चहाची चव वाढेल. घरी चहा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा घरीच करता येईल. (How To Make Chaha Masala)
चहा मसाला घरी बनवण्यासाठी लाागणारं साहित्य
१) सुठं- १०० ग्रॅम
२) वेलची- ५० ग्रॅम
३) काळी मिरी- ५० ग्रॅम
४) दालचिनी - २५ ग्रॅम
५) लवंग - २५ ग्रॅम
६) बडीशेप - २५ ग्रॅम
७) जायफळ पावडर - अर्धा टिस्पून
८) तुळशीची पानं - १० ते १२
चहा मसाल्याची कृती (Chai Masala Recipe)
चहा मसाला पावडर बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुंठ छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर एक तवा गरम करून त्या पॅनमध्ये सुंठाचे तुकडे मध्यम आचेवर गरम करून घ्या. सुंठातील मॉईश्चर कमी झाल्यानंतर सुंठ एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर तव्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि वेलची घाला. नंतर यात दालचिनी आणि बडिशेप घाला. शेवटी तुळशीची पानं घालून त्यात सर्व मसाले घालून एक मिनिटासठी भाजून घ्या. मसाल्याचा सुगंध आल्यानंतर गॅस बंद करा. भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्या. मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या.
मिक्सर जारमध्ये सुंठ बारीक वाटून घ्या. सुंठ बारीक वाटून घ्या नंतर सुंठ पावडर एका वाटीत काढून घ्या. नंतर मिक्सर जारमध्ये भाजलेले मसाले घालून बारीक वाटून घ्या. शेवटी भाजलेल्या मसाल्यांबरोबर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर तुम्ही यात केसरही घालू शकता. तयार आहे चहा मसाला पावडर. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्ब्यात भरून ठेवू शकता.