Lokmat Sakhi >Food > टपरीसारखा फक्कड-दाट चहा करा घरीच; वापरा ‘हा’ खास चहा मसाला, पावसाळ्यासाठी खास चहा

टपरीसारखा फक्कड-दाट चहा करा घरीच; वापरा ‘हा’ खास चहा मसाला, पावसाळ्यासाठी खास चहा

How To Make Chaha Masala At Home : पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 09:08 AM2024-06-15T09:08:00+5:302024-06-15T16:22:22+5:30

How To Make Chaha Masala At Home : पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते.

How To Make Chaha Masala At Home : Chai Masala Recipe How To Make Chai Masala At Home | टपरीसारखा फक्कड-दाट चहा करा घरीच; वापरा ‘हा’ खास चहा मसाला, पावसाळ्यासाठी खास चहा

टपरीसारखा फक्कड-दाट चहा करा घरीच; वापरा ‘हा’ खास चहा मसाला, पावसाळ्यासाठी खास चहा

मसाला चहाचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. चहाच्या टपरीवर मिळतो तसा मसाला पिण्याची इच्छा अनेकांना होते.  मसाला चहा घरी करणं वाटतं तितकं सोपं नाही  यासाठी  मसाला करण्याची परफेक्ट रेसेपी माहित असायला लागते.  रेस्टॉरंटमध्ये किंवा टपरीवर मिळतो तसा चहा करण्यासाठी मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी माहित असायला लागते.  पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. अशात जर तुम्ही घरी बनवलेला चहा मसाला वापरला तर चहाची मजाच वाढेल. बिस्किटांसोबत तुम्ही चहाचा आनंद  घेऊ शकता. (How To Make  Chai Masala At Home)

चहा मसाला करताना कधीही घालून चालत नाही. चहा मसाला घालण्याचं योग्य टायमिंग असते. यामुळे चहाची टेस्ट हॉटेलसारखी किंवा रेस्टाँरंटसाठी  लागते अशा स्थितीत तुम्ही ही  रेसेपी फॉलो करू शकता. सुगंधित चहा मसाला करण्यासाठी तुम्ही  ही रेसेपी फॉलो करू शकता. इंस्टाग्राम युजर (@aartimadan) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती शेअर केली आहे. 

चहा मसाला पावडर बनवण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा कप हिरवी वेलची, ५ काळ्या वेलच्या, २ चमचे बडीशेप २ चमचे काळी मिरी, १ चमचा लवंग, २ चमचे  दालचिनीचे तुकडे,  तीन इंचाचा आल्याचा तुकडा, १ छोटा सुंठाचा तुकडा,  १ जायफळ, १ चक्र फुल याची आवश्यकता असेल.  हे सर्व साहित्या मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. हा मसाला तुम्ही फ्रिजमध्ये अनेक दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. 

कंबरेत वेदना-गुडघे दुखतात; १ चमचा 'या' लाल बिया खा, कॅल्शियम खच्चून मिळेल-हाडं बळकट

परफेक्ट चहा मसाला करण्यासाठी एका पॅनमध्ये २ कप पाणी घ्या. जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात साखर आणि चहा पावडर घाला.  चहा एक ते दोन मिनिटांसाठी उकळवून घ्या त्यात दूध घालून पुन्हा मिक्स करा. दूध घातल्यानंतर पुन्हा चहा उकळवून घ्या. नंतर २ ते ३ मिनिटं पुन्हा उकळवा. त्यात अर्धा चमचा चहा मसाला घालून मिक्स करा. चहाला उकळ येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. चहा एक ते दोन मिनिटांसाठी झाकून ठेवा. त्यानंतर चहा कपात सर्व्ह करा आणि गरमागरम मसाला चहाचा आनंद घ्या. 

Web Title: How To Make Chaha Masala At Home : Chai Masala Recipe How To Make Chai Masala At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.