Join us  

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 11:37 AM

Diwali Recipe : How to make Chakali Bhajni at home : भाजणीचं परफेक्ट तंत्र माहिती असल्यास, रेडिमेड चकली किंवा तयार भाजणी विकत आणण्याची गरजच पडणार नाही...

दिवाळी (Diwali 2023) सण आला की फराळ बनवण्याची तयारी घराघरांत सुरु होते. लाडू, चकली, चिवडा असे बरेच फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. सगळ्या फराळांतील कुरकुरीत चकली सगळ्यांच्याच आवडीची. कुरकुरीत आणि खमंग चवीची चकली तेव्हाच शक्य होते जेव्हा चकलीची भाजणी (Diwali Recipes) उत्तम असते. भाजणीच जर चुकीच्या पध्दतीने केली, त्यातील सामग्रीचं प्रमाण चुकवलं तर कितीही प्रयत्न करुन चकली कुरकुरीत आणि खमंग चवीची होत नाही. हल्ली भाजणीच्या चकलीचा (bhajani chakli) घाट घालायला नको म्हणून अनेकजणी रेडिमेड चकली किंवा तयार भाजणी (bhajanichi chakali diwalli faral) आणून त्याच्या चकल्या करतात. याउलट काहीजणी  तांदळाची, मुगाच्या डाळीची किंवा मैद्याची इन्स्टंट तयार होणार्‍या चकल्या करतात. पण या चकल्यांना भाजणीच्या चकलीची चव काही येत नाही(Chakli Bhajni Recipe).

भाजणीच्या पिठाची चकली आवडत असल्यास त्याला पर्याय एकच तो म्हणजे भाजणी उत्तम कशी होईल याकडे लक्ष देणे. भाजणी जर उत्तम जमली तर चकली अगदी हमखास कुरकुरीत, खमंग होतेच. भाजणी बनवताना ती परफेक्ट होण्यासाठी त्यात कोणते जिन्नस किती प्रमाणात असावेत, भाजणी नेमकी कशी बनवावी याबाबत काही गृहिणींचा गोंधळ उडतो. परंतु असे होऊ नये म्हणून एकदा का भाजणीचे योग्य प्रमाण लक्षात आले तर भाजणीची चकली (Perfect Ingredients For Chakali Bhajani) परफेक्ट झालीच समजा. भाजणीची चकली तयार करण्यासाठी भाजणी कशी तयार करावी याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make Chakali Bhajni).

साहित्य :- (१ किलोची भाजणी बनवण्यासाठीचे प्रमाण)

१. तांदूळ - ६०० ग्रॅम २. चण्याची डाळ - २०० ग्रॅम ३. पिवळी मूग डाळ - १२५ ग्रॅम ४. पांढरी उडदाची डाळ - ७५ ग्रॅम ५. पोहे - १०० ग्रॅम ६. साबुदाणा - ५० ग्रॅम ७. जिरे - २० ग्रॅम ८. धणे - २० ग्रॅम 

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

कृती :- 

१. भाजणी करण्याआधी तांदूळ, पिवळी मूग डाळ, पांढरी उडदाची डाळ हे तिन्ही वेगवेगळे पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत. धुवून घेतल्यानंतर ते एका स्वच्छ सुती कापडावर वाळत घालावेत. (आपण हे २ ते ३ तास फॅनखाली किंवा संपूर्ण रात्रभर व्यवस्थित वाळवून घेऊ शकतो.)२. आता एका कढईत हे तांदूळ, पिवळी मूग डाळ, पांढरी उडदाची डाळ तिन्ही जिन्नस वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर चण्याची डाळ, पोहे, साबुदाणा देखील भाजून घ्यावा. 

दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

दिवाळीच्या सुटीत मुलं म्हणणारच आई आज काय स्पेशल ? पालक - मेथी पुऱ्यांची घ्या झटपट रेसिपी-खुसखुशीत खाऊ...

३. हे सगळे जिन्नस कोरडे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करुन कढई गरम असतानाच धणे व जिरे एकदम एकाचवेळी भाजून घ्यावेत. ४. आता हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. त्यानंतर ही भाजणी थोडीशी थंड होऊ द्यावी. भाजणी थंड झाल्यानंतर ही भाजणी गिरणीतून दळून आणावी. 

अशाप्रकारे आपली चकली भाजणी तयार आहे. ही भाजणी वापरुन आपण कुरकुरीत, चविष्ट, मसालेदार भाजणीच्या चकल्या सहज बनवू शकता.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृती