Lokmat Sakhi >Food > चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत

चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत

How To Make Chakali For Diwali Faral: चकलीची भाजणी तयार करताना काय करावं आणि काय टाळावं हे एकदा पाहा.. यंदाच्या दिवाळीत (Diwali Celebration 2024) तुमच्या घरच्या चकल्याच ठरतील सगळ्यात जास्त हिट...(chakali bhajani recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 02:35 PM2024-10-19T14:35:32+5:302024-10-19T16:12:55+5:30

How To Make Chakali For Diwali Faral: चकलीची भाजणी तयार करताना काय करावं आणि काय टाळावं हे एकदा पाहा.. यंदाच्या दिवाळीत (Diwali Celebration 2024) तुमच्या घरच्या चकल्याच ठरतील सगळ्यात जास्त हिट...(chakali bhajani recipe)

how to make chakali for diwali faral, chakali bhajani recipe, how to make perfect chakali | चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत

चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत

Highlightsतुम्ही चकल्या करण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी या काही चकली भाजणीच्या रेसिपी नक्की बघून घ्या

दिवाळी आली म्हटलं की आपोआपच फराळाचे वेध लागतात. हल्ली तर दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थांपेक्षा खमंग खुसखुशीत पदार्थच अनेक जण आवडीने खातात. त्यामुळे मग चकल्या, शेव, चिवडा या तिखट पदार्थांना जरा जास्त मागणी असते. पण नेमकं होतं काय की आपण मोठ्या उत्साहाने चकल्या करायला जातो, पण नेमकी काहीतरी प्रमाण हुकतं आणि आपल्याकडची चकली जरा जास्तच कडक होते (how to make chakali for diwali faral?). अशी वातड, कडक चकली अजिबात खाल्ली जात नाही. म्हणूनच आता जर तुम्ही चकल्या करण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी या काही चकली भाजणीच्या रेसिपी नक्की बघून घ्या (chakali bhajani recipe).. यामध्ये सांगितलेल्या अचूक टिप्स तुमच्या चकलीला नक्कीच अधिक खुसखुशीत- खमंग बनवतील.(how to make perfect chakali?)

चकली भाजणी रेसिपी

 

साहित्य

४ वाट्या तांदूळ 

दिड वाटी हरबरा डाळ

पाऊण वाटी मूग डाळ

अर्धी वाटी उडीद डाळ 

अर्धी वाटी साबुदाणा

२ वाट्या पोहे

चवीनुसार तिखट- मीठ

धणे आणि जिरे प्रत्येकी २० ग्रॅम

पाऊण कप तेल

१ टेबलस्पून ओवा

२ टेबलस्पून तीळ

 

कृती 

सगळ्यात आधी तर तांदूळ आणि तिन्ही डाळी दोन- तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या चाळण्यांमध्ये टाकून त्यातलं पाणी पुर्णपणे निथळू द्या. यानंतर एका स्वच्छ सुती कपड्यावर ते रात्रभर सुकायला ठेवा.

काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तांदूळ, डाळी, साबुदाणा, पोहे, धणे, जिरे असं सगळं एकेक करून भाजून घ्या.

 

भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाले की ते गिरणीतून दळून आणा. 

मूड ऑफ झाला-खूपच उदास वाटतं? ५ पदार्थ खा- शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढून वाटेल फ्रेश

त्यानंतर या पिठामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, तीळ, ओवा टाका आणि तेल गरम करून टाका. सगळं पीठ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कडक पाणी टाकून ते पीठ मळून घ्या. छान मऊसूत पीठ मळून झाल्यानंतर त्याच्या चकल्या करा.. बघा या पद्धतीने केलेली चकली नक्कीच अधिक खमंग, खुसखुशीत होईल. 

 

Web Title: how to make chakali for diwali faral, chakali bhajani recipe, how to make perfect chakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.