चंपाकळी हार हा स्त्रियांचा गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यातला प्रत्येक घटक हा सोनचाफ्याच्या कळीप्रमाणे फुगीर असतो. सोन्यात बनविलेल्या हा हाराची जडण - घडण कळ्यांच्या गजऱ्यासारखी दिसते. असा हा दागिना प्रत्येक स्त्रीला आवडतोच. परंतु चंपाकळी या दागिन्यांसोबतच चंपाकळी नावाचा एक दिवाळीला केला जाणारा खास पारंपरिक फराळाचा पदार्थ देखील आहे. चंपाकळी हा पारंपरिक जुना फराळाचा पदार्थ आजकाल फराळाच्या ताटात दिसेनासा झाला आहे. फारच कमी लोकांना फराळाचा हा पदार्थ माहित असेल(Maharashtrian Sweet Dish - Champakali).
चंपाकळी म्हणजे सोनचाफ्याच्या आकाराची गोड खारी शंकरपाळी. ही विशेष प्रकारची शंकरपाळी दिसायला खूपच सुरेख दिसते व बनवायला खूपच सोपी आहे. विशेषतः लहान मुलांना ही फार आवडते. यात आपण वेगवेगळे रंग घालून ती आणखीन आकर्षक बनवू शकता. एरव्ही दिवाळीला आपण गोड किंवा खारी शंकरपाळी अवश्य बनवतो व आवडीने खातो. परंतु यंदाच्या दिवाळीला ही पारंपरिक गोड पाकातली चंपाकळी (Pakatli Champakali) नक्की करुन पहा(How To Make Chamapakali Diwali Faral Special Recipe).
साहित्य :-
१. मैदा - २ + १/२ कप
२. तेल - २ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. पिवळा खायचा रंग - १ टेबलस्पून
५. पाणी - गरजेनुसार
६. साखर - ३०० ग्रॅम
७. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून
८. केशर - १० ते १२ काड्या
९. तेल - तळण्यासाठी
दिवाळीत गोड तर खायचे पण साखर नको ? घ्या साखरेला ४ पर्याय, करा गोड फराळ...
आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...
कृती :-
१. सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात तेल, चवीनुसार मीठ, खायचा पिवळा रंग घालून सर्व जिन्नस मिसळून घ्यावेत. त्यानंतर या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
२. पीठ मळून ते छान मुरण्यासाठी बाजूला झाकून ठेवून द्यावे.
३. पाक तयार करण्यासाठी एका कढईत साखर व पाणी मिसळून त्याचा एकतारी पाक तयार करुन घ्यावा. पाक तयार होत आला की त्यात वेलची पावडरव आपल्या आवडीनुसार केशर घालून घ्यावे.
४. आता चंपाकळी बनवण्यासाठी मळून घेतलेल्या पिठाचे लहान - लहान गोळे तयार करुन घ्यावेत. या लहान गोळ्याच्या मध्यम आकाराच्या गोलाकार पोळ्या लाटून घ्याव्यात.
चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...
दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...
५. या पोळ्या लाटून झाल्यावर सुरीने या पोळीवर उभ्या रेषा मारुन चंपाकळीच्या कळ्या पाडून घ्याव्यात.
६. या कळ्या पाडून झाल्यावर या गोलाकार पोळीच्या कडांना बोटांनी हलकेच पाणी लावून घ्यावे. त्यानंतर ही चंपाकळी रोल सारखी गोल गोल गुंडाळत नेत त्याचा रोल बनवून घ्यावा. कडेला जर जास्तीचे पीठ राहिले असेल तर ते सुरीने कापून घ्यावे.
७. कढईत तेल घेऊन या चंपाकळी खरपूस तळून घ्याव्यात.
८. सर्व चंपाकळी तळून झाल्यानंतर त्या एक एक करून साखरेच्या तयार केलेल्या पाकात घालून २ ते ३ मिनिटे पाकात घोळवून घ्याव्यात.
आपल्या पाकातल्या चंपाकळी खाण्यासाठी तयार आहेत.