Join us  

विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 10:59 AM

How to make Chana Dhokla-Gujrati Special Recipe : गुजराथी पद्धतीचा खमण ढोकळा करायचा असेल तर, या पद्धतीने करून पाहा, बनेल परफेक्ट जाळीदार स्पंजी ढोकळा

नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, इडली, डोसा हे पदार्थ खाल्ले जातात. पण रोज रोज चपाती-भाजी, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा येतो. साऊथ इंडियन पदार्थ किंवा चपाती भाजी व्यतिरिक्त आपल्याला हटके काहीतरी खायचं असेल तर, गुजराथी स्पेशल खमण ढोकळा (Khaman Dhokla) करून पाहा. खमण ढोकळा फक्त गुजराथी लोकांमध्ये प्रसिद्ध नसून, महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये तयार होते.

हलकी-फुलकी स्फॉट स्पंजी ढोकळा करायला सोपा आणि चवीला भन्नाट लागतो. काही जण ढोकळा खाण्याचा आनंद हिरव्या चटणीसह किंवा गोड चटणीसह लुटतात. खमण ढोकळा मुंबई उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो (Cooking Tips). जर आपल्याला गुजराथी पद्धतीचा (Gujrati Special) ढोकळा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा(How to make Chana Dhokla-Gujrati Special Recipe).

गुजराथी पद्धतीचा खमण ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

हिरव्या मिरच्या

आलं

दही

पाणी

हळद

ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

मीठ

तेल

मोहरी

साखर

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात दोन वाटी भिजलेली चणा डाळ, २ ते ३ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, ३ टेबलस्पून आंबट दही व थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. पीठ आंबवण्यासाठी त्यावर ८ ते १० तासांसाठी झाकण ठेवा.

८ तास झाल्यानंतर त्यात चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल घालून साहित्य चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून एका बाजूने ढवळून घ्या. ढोकळ्याच्या पात्रात थोडे तेल घालून हात फिरवा. जेणेकरून पात्रात ढोकळा चिकटणार नाही. नंतर त्यात तयार पीठ घाला.

५-६ हिरव्या मिरच्या, मुठभर शेंगदाणे, तव्यावर करून पाहा अस्सल झणझणीत चवीचा कोल्हापुरी खर्डा, वाढेल जिभेची चव

स्टीमरमध्ये भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवा. १५ मिनिटांसाठी ढोकळा वाफेवर शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही, हे चेक करा. ढोकळा तयार झाल्यानंतर भांडं बाहेर काढून, त्याचे चौकोनी काप करा. दुसरीकडे छोट्या कढईत २ चमचे तेल घाला, नंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, साखर आणि थोडे पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व तयार फोडणी तयार ढोकळ्यावर ओतून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे खमण ढोकळा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सगुजरात