छोटी भूक भागवण्यासाठी आपण फुटाणे खातो (Chana - Futana). मुठभर फुटाणे खाल्ल्याने पोट भरते, यासह वेट लॉस करण्यासही मदत मिळते. त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Food). ज्यामुळे मसल्स गेनसाठी मदत होते (Weight Loss). आहारतज्ज्ञ, डॉक्टर नेहमीच स्नॅक्समध्ये फुटाणे खाण्याचे सल्ला देतात.
भाजलेल्या चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, फायबर आणि व्हिटामिन असते. ज्यामुळे आरोग्यला फायदेच मिळतात.
याशिवाय त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन वाढत नाही. पोट भरते, आणि वेट लॉससाठीही मदत होते. पण अनेकदा घरातले फुटाणे संपतात. जर बाजारात जाऊन फुटाणे विकत आणायचं नसेल तर, प्रेशर कुकरमध्ये फुटाणे तयार करा. मिनिटात फुटाणे तयार होतील(How to make chana futana in pressure cooker Indian style).
प्रेशर कुकरमध्ये फुटाणे कसे तयार करायचे?
लागणारं साहित्य
हरभरे
सकाळी 'या' वेळी झोपेतून उठण्याचे पाहा फायदे, बदलून जाईल आयुष्य; प्रत्येक कामात मिळेल यश
बेकिंग सोडा
पाणी
मीठ
तयार करण्याची पद्धत
- सर्वात आंधी एका भांड्यात २ कप कच्चे हरभरे घ्या. त्यात दोन चिमुटभर बेकिंग सोडा घाला. त्यानंतर एक चमचा पाणी घाला. जेणेकरून बेकिंग सोडा हरभऱ्याला चांगलेच चिकटेल.
- प्रेशर कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आणि त्यात एक कप मीठ घाला. आता हाय फ्लेमवर मीठ चांगले गरम होऊ द्या. मीठ व्यवस्थित भाजून घ्या.
जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट
- आता गरम मिठात हरभरा घाला आणि चमच्याच्या मदतीने ढवळत राहा. असं केल्याने हरभरा चांगलाच भाजला जाईल. आता प्रेशर कुकरच्या झाकणातून रबर काढा आणि झाकण लावा. गॅसची फ्लेम हाय ठेवा. अधून मधून कुकर ढवळत राहा.
- २ मिनिटांनंतर कुकरचं झाकण काढा. तुम्हाला दिसेल बाजाराप्रमाणे चणे भाजले जाईल. अशा पद्धतीने गरम बाजारात मिळतात तसे फुटाणे खाण्यासाठी रेडी.