Join us  

धो - धो कोसळणाऱ्या पावसात चमचमीत खावंसं वाटतंय? घ्या चणा गार्लिक फ्राय करण्याची चटकदार रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 8:10 PM

Dhaba Style Chana Garlic Fry : Veg Starter Recipe : चणा गार्लिक फ्राय करण्याची चमचमीत रेसिपी...

कुठल्याही रेटॉरंटमध्ये गेल्यावर जेवणा आधीच्या स्टार्टर डिशलाच सगळ्यांत जास्त पसंती दिली जाते. स्टार्टर डिश मधील चटपटीत पदार्थ म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. स्टार्टरमध्ये अनेक मसालेदार, चटपटीत पदार्थ खाण्यात मज्जा काही औरच असते. या स्टार्टरमध्ये आपण चण्याचे तयार केलेले अनेक पदार्थ खातो. यात चटपटीत चणा, चणा चाट, मसालेदार चणा, चना मसाला असे अनेक स्टार्टचे पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. 

सध्या पावसाळ्याचा ऋतू आहे. बाहेर पडणाऱ्या धो - धो कोसळणाऱ्या पावसाला पाहून आपल्याला काहीतरी गरमागरम, चटपटीत, मसालेदार खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण कांदा भजी, बटाटा भजी असे अनेक चटपटीत, मसालेदार पदार्थ बनवतो. यंदाच्या पावसाळ्यात आपण झटपट होणारा व खायला मसालेदार लागणारा असा चणा गार्लिक फ्राय बनवून ते खाता - खाता पावसाचा आनंद घेऊ शकतो. घरच्या घरी चणा गार्लिक फ्राय बनवण्याची सोपी, झटपट कृती पाहूयात(How To Make Chana Garlic Koliwada Recipe - Quick Snacks Recipe).      

साहित्य :- 

१. काबुली चणे (छोले) - १ कप (७ ते ८ तास पाण्यांत भिजवून घेतलेले)२. कॉर्न फ्लॉवर - २ टेबलस्पून ३. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून ४. तेल - ४ ते ५ टेबलस्पून ५. लसूण पाकळ्या - ७ ते ८ ६. हिरव्या मिरच्या - २ ७. हळद - १/२ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १०. चाट मसाला - १ टेबलस्पून ११. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

कृती :- 

१. सर्वप्रथम, काबुली चणे स्वच्छ धुवून एका बाऊलमध्ये किमान ७ ते ८ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावे. २. आता हे भिजवलेले काबुली चणे कुकरला लावून ३ ते ४ शिट्ट्या काढून व्यवस्थित उकडवून घ्यावेत. ३. उभा उकडवून घेतलेल्या चण्यांमध्ये, कॉर्न फ्लॉवर व तांदुळाचे पीठ घालून चणे व्यवस्थित कोट करुन घ्यावेत.४. आता हे कोट केलेले चणे तेलात डिप फ्राय करुन खरपूस तळून घ्यावेत. ५. त्यानंतर लसूण पाकळ्या सालीसकट घेऊन त्यांना हलके ठेचून घ्यावे. आता या ठेचलेल्या लसूण पाकळ्या तेलात घालून त्या देखील तळून घ्याव्यात. 

अस्सल गावरान झणझणीत चवीचं मेथी पिठलं खाऊन तर पाहा, पावसाळ्यातला झक्कास बेत!

अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...

६. आता एका वेगळ्या पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट मसाला घालून घ्यावे. ७. त्यानंतर या मिश्रणात तळून क्रिस्पी करून घेतलेले काबुली चणे व तळून घेतलेला लसूण घालावा.८. हे सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे, आता त्यात चवीनुसार मीठ व चाट मसाला घालावा. ९. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन भुरभुरवून घ्यावी. 

टम्म फुगलेली रवा - मसाला पुरी आणि आल्याचा चहा ! नाश्ता असा भारी, खा खमंग मसाला पुरी...

चणा गार्लिक फ्राय खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती