जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये काही बनवलं गेलं नाही तरी चपात्या बनवल्या जातात. भारतीय आहारात एक महत्वाचा भाग आहे. पण चपात्या करणं खूप झंझटचं काम वाटतं. (Cooking Hacks) गोल गोल चपात्या बनवणं वाटतं तितकं सोपं नाही. चपात्या करण्याची प्रक्रिया ही खूपच वेळखाऊ असते (How To Make Chapati Fast). जेव्हा अशा चपात्या करणं बोरींग काम वाटतं. (Chapati Making Hacks) चपात्या करण्याचा बेसिक ट्रिक्स माहित असतील तर तुमचं काम सोपं होईल आणि भराभर चपात्या करून होतील आणि स्वयंपाकाचा वेळ वाचेल. (Viral Trick to Make Two Rotis by Chef Pankaj Bhadoria)
एकावेळी भरपूर चपात्या ट्रिक कोणती
चपात्या करण्यात भरपूर मेहनत लागते. एक चपाती करण्यातच बराचवेळ निघून जातो. जेव्हा तुमच्या घरात जास्त लोक नसतात तेव्हा तुम्ही पटापट हे काम करू शकता. पण जास्त लोक असतील तर हे काम संपवण्यास वेळ लागू शकतो. यात तुमचा बराच वेळ जाऊ शकतो. ही ट्रिक वापरून तुम्ही २ -२ चपात्या बनवू शकता.
१) सगळ्यात आधी चपातीसाठी २ मोठ्या आकाराचे गोळे घ्या. नंतर चपातीच्या गोळ्याला हलक्या हातानं दाबून त्यावर तेल लावा. नंतर थोडं सुकं पिठ शिंपडा.
२) आता दोन्ही गोळे एकावर एक ठेवून साध्या चपातीप्रमाणे लाटणं सुरू करा. मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर चपाती शेकायला ठेवा.
३) थोड्या वेळानं चपाती शिजू लागेल. दोन्ही चपात्या वेगवेगळ्या होतील. दोन्ही चपात्या वेगवेगळ्या शेका. तुमच्या २ चपात्या एकाचवेळी तयार होतील.
४) सगळ्यात आधी चपातीला नॉन स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी डाग येईपर्यंत शिजवून घ्या. नंतर थेट आचेवर ठेवा. नंतर तव्यावर चपाती जास्तवेळ ठेवू नका. चपाती शिजली की गॅस बंद करा.
बायकोचं ऐका, हार्ट ॲटॅक टाळा; संशोधनातून खुलासा-बायकोचं ऐकणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी
५) चपाती तव्यावर घालण्याआधी तिचं एक्स्ट्रा पीठ काढून टाका. जास्त सुकं पीठ असेल तर चपाती कोरडी बनते आणि तुम्हाला हवी तशी मऊ होणार नाही.
६) चपातीचं पीठ मळताना त्यात २ ते ३ चमचे दूध किंवा तुपाचा वापर करा. ज्यामुळे चपात्या मऊ होतील आणि कडकपणा येणार नाही.