घरोघरी मिरचीचं, लिंबाचं, आंब्याचं लोणचं घातलं जातं. प्रत्येक घरच्या लोणच्याची चव काही वेगळीच असते. कारण लोणचं घालण्याची पद्धत, त्यात वापरल्या गेलेल्या मसाल्यांचे प्रमाण हे सगळं वेगवेगळं असतं. आपल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने अन्य राज्यांमध्ये लोणची घातली जातात. त्यामुळे प्रत्येक प्रांतानुसार लोणच्याची काही वैशिष्ट्ये असतात. म्हणूनच खवय्यांना त्यांचा आस्वाद घ्यायला विशेष आवडतं (Banarasi style chili pickle recipe).. म्हणूनच आता अस्सल बनारसी स्टाईलचं लाल मिरचीचं लोणचं घालून पाहा (How to make chili pickle). हे लोणचं जर जेवणात तोंडी लावायला असेल तर बघा साध्याच्या जेवणालाही कशी मस्त चव येईल... (How to make mirchi ka achar)
लाल मिरचीचं लोणचं घालण्याची रेसिपी
साहित्य
१० ते १५ ओल्या लाल मिरच्या
२ टेबलस्पून मोहरी
३ टेबलस्पून बडिशेप
राष्ट्रीय बालिका दिनी काजोलची न्यासासाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली लेकीला एवढं सक्षम बनवू की.....
२ टेबलस्पून मेथीदाणे
१ टेबलस्पून जिरे
८ ते १० मिरे
पाव टीस्पून हिंग
अर्धा टेबलस्पून हळद
३ टेबलस्पून आमचूर पावडर
तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस
दोन लिंबांचा रस
२ टेबलस्पून मोहरीचं तेल
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी लाल मिरच्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मिरच्यांमध्ये पाणी किंवा ओलसरपणा राहणार नाही, याची काळजी घ्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढरा कुर्ता, पंजाबी ड्रेस घ्यायचाय? बघा कमी किमतीत ३ सुंदर पर्याय
यानंतर मिरच्यांची देठं काढून टाका आणि त्यांना उभा छेद द्या.
आता मोहरी, बडिशेप, मिरे, जिरे, मेथी दाणे हा सगळा मसाला मध्यम आचेवर भाजून घ्या. मसाला जळणार नाही, याची काळजी घ्या. भाजलेला मसाला थंड झाला की मग मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.
या मसाल्यामध्ये आमचूर पावडर, गरम करून पुन्हा थंड झालेले तेल, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस टाका आणि मसाला कालवून घ्या. हा मसाला थोडा थोडा मिरच्यांमध्ये भरा.
दुपट्टा कमाल का!! तिरंगा ओढणी घ्या एकदम स्वस्तात, खरेदी करा नव्या स्टाइलच्या सुंदर ओढण्या
त्यानंतर एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत आधी तळाला लोणच्याचा थोडा मसाला टाका. त्यानंतर मिरच्या घाला. मिरच्या आणि मसाला असं एकावर एक थर देत बरणी भरा. उरलेला मसाला मिरच्यांच्यावर टाका. पुन्हा वरून थेाडं तेल घाला आणि बरणीचं झाकण लावून ठेवा.
सुरुवातीला ८ ते १० दिवस हे लोणचं नियमितपणे हलवावं. व्यवस्थित काळजी घेऊन स्वच्छता पाळली तर वर्षभर हे लोणचं टिकतं.