Lokmat Sakhi >Food > दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत

How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe : संध्याकाळी खेळून मुलं दमून - भागून घरी आल्यावर आपण त्यांना स्टफिंग केलेले चटपटीत पराठे देऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2023 01:13 PM2023-05-06T13:13:54+5:302023-05-06T16:06:41+5:30

How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe : संध्याकाळी खेळून मुलं दमून - भागून घरी आल्यावर आपण त्यांना स्टफिंग केलेले चटपटीत पराठे देऊ शकतो.

How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe | दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की लहान मुलांच्या धमाल, मज्जा, मस्ती करण्यासाठीची हक्काची सुट्टी. शाळा, परीक्षा संपल्यानंतरची निवांत सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी. या सुट्टीत मुलं दंगा - मज्जा, मस्ती करण्यासोबतच भरपूर खादाडगिरी देखील करतात. या सुट्टीत मुलांना खेळण्यासोबतच भरपूर खादाडगिरी देखील करायला आवडते. सुट्टी असल्यामुळे रोज उशिरा उठणं, भरपूर खेळणं सोबतच आईच्या हातचे मस्त चटक मटक पदार्थ खाण इतकच काम या मुलांना सुट्टीमध्ये असत. अशावेळी मुलं बाहेरुन खेळून, दमून - भागून येतात आणि मग आई भूक लागली म्हणून आईच्या मागे लागतात. मग रोजचे तेच तेच उपमा, पोहे, डोसे, इडली खायला मुलं नाक मुरडतात. त्यांना काहीतरी लज्जतदार, चमचमीत, चीझी खायला हवं असत. अशा परिस्थितीत त्या आई समोर रोज काय नवीन बनवू असा प्रश्न उभा राहतो. 

'पराठा' हा एक असा पदार्थ आहे जो आपल्यात सगळं सामावून घेतो. पराठ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा इतर काही पदार्थांचे स्टफिंग भरुन मुलांना खायला देऊ शकतो. यामुळे काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंदही मुलांना होतो तसेच यानिमित्ताने मुलांच्या पोटात पौष्टिक पालेभाज्या देखील जातात. संध्याकाळी खेळून मुलं दमून - भागून घरी आल्यावर आपण त्यांना असे स्टफिंग केलेले चटपटीत पराठे देऊ शकतो. या पराठ्यांमध्ये आपण मुलांच्या आवडीचा चीज पराठा देखील बनवू शकतो. चीज पराठा बनवण्याची सोपी कृती(How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe).

साहित्य :- 

१. गव्हाचं पीठ - १ कप 
२. चीज स्लाइस - २ ते ३ 
३. चिली फ्लेक्स - १ ते २ टेबलस्पून 
४. बटर - १ टेबलस्पून 

उन्हाळ्यात घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खास पदार्थ - ‘काकडीची बोट’! पौष्टिक आणि चमचमीत चव नक्की आवडेल...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन कणिक मळून घ्यावे. 
२. ही मळून घेतलेली कणिक १० ते १५ मिनिटे बाजूला तशीच ठेवून द्यावी. 
३. त्यानंतर या कणकेचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. 
४. आता या कणकेची पोळी लाटून घ्यावी. 

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

५. पोळी लाटून घेतल्यानंतर या पोळीच्या बरोबर मध्यभागी एक चीज स्लाइस ठेवावा.   
६. या चीज स्लाइसवर चिली फ्लेक्स भुरभुरवून घ्यावेत. 
७. आता ही पोळी चारही बाजुंनी दुमडून तिचा लिफाफा बनवून घ्यावा. त्यानंतर या पराठ्याचा आकार चौकोनी होईल. हा पराठा त्यानंतर परत एकदा लाटून घ्यावा. 
८. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडेसे बटर घालून त्यावर हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. 

खाण्यासाठी गरमागरम चीज पराठा तयार आहे. हा चीज पराठा हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.