दिवाळीचा सण (Diwali 2024) आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीचा फराळ करण्याची लगबग सध्या प्रत्येक घरात सुरु असेलच. काहींचा तर सगळा फराळ बनवून तयार देखील झाला असेल. दिवाळीचा फराळ (Diwali faral recipe) करणे म्हणजे एक प्रकारची कलाच असते. फराळाच्या ताटातील प्रत्येक पदार्थ हा चवीला टेस्टी झालाच पाहिजे, त्याचप्रमाणे तो दिसायलाही तितकाच सुंदर आणि आकर्षक असणे गरजेचे असते. फराळाच्या ताटातील करंजी आणि चिरोटे करणे म्हणजे अतिशय वेळखाऊ वेळखाऊ आणि नाजूक काम असते. दिवाळीच्या फराळांमध्ये करंजी इतकीच खुसखुशीत, इन्स्टंट होणारी रेसिपी म्हणजे चिरोटे. (How to make chirote).
पाकातील आणि पिठीसाखर भुरभुरवून केलेले अशा दोन्ही प्रकारचे चिरोटे फराळाची लज्जत वाढवतात. गोड चिरोटे खायला आवडत असले तरीही ते तयार करण्यासाठी फार मोठा घाट घालावा लागतो. परफेक्ट गोड, अनेक पदरी पांढरेशुभ्र चिरोटे न बिघडता घरच्या घरी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make chirote at home for diwali).
साहित्य :-
१. मैदा - १ + १/२ कप २. तूप - ४ टेबलस्पून ३. मीठ - चवीनुसार ४. पाणी - १/२ कप ५. कॉर्नफ्लॉवर - ३ ते ४ टेबलस्पून ६. पिठीसाखर - ३ टेबलस्पून
लाडू असो की वड्या, पाक हमखास चुकतो? ५ चुका टाळा-पाक कधीच बिघडणार नाही...
अंबानींच्या घरच्या लाडूंची व्हायरल चर्चा, पाहा ‘अंबानी लाडू’ करण्याची शाही रेसिपी, दिवाळी स्पेशल...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ, तूप व गरजेनुसार पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी. २. आता हे मळून घेतलेले कणीक झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. ३. एका वाटीत थोडसं तूप घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून किंचित घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. ४. आता झाकून ठेवलेली कणीक पुन्हा एकदा नीट मळून घ्यावी. कणीक मळून झाल्यानंतर या कणकेचे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. ५. कणकेचे हे गोळे घेऊन त्याची एक एक चपाती लाटून घ्यावी.
ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...
६. आता गोलाकार लाटून चपातीसारखाच गोल आकार आल्यावर या संपूर्ण गोलाकार चपातीला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची तयार पेस्ट पसरवून लावून घ्यावी. ७. अशाप्रकारे एकावर एक अशी कॉर्नफ्लॉवर - तुपाची पेस्ट लावून लाटलेल्या चपात्या एकावर एक ठेवून घ्याव्यात. त्यानंतर या चपात्या एकत्रित गोलाकार रोल सारख्या गुंडाळून त्याची सुरनळी करून घ्यावी. आता या रोलला कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत. ८. कापून घेतलेले छोटे गोळे अलगदपणे लाटून घ्यावेत. ९. कढईत तेल गरम करून त्यात एक एक करून हे चिरोटे सोडावेत आणि मंद आचेवर खरपूस तळून घ्यावेत.१०. सगळ्यात शेवटी या तळून घेतलेल्या चिरोट्यांवर पिठीसाखर भुरभुरवून घ्यावी.
खमंग, खुसखुशीत भरपूर लेयर्स असणारे चिरोटे खाण्यासाठी तयार आहेत.