सध्या परीक्षा संपून मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. सुट्टी पडल्याने मुलं दिवसभर मज्जा, मस्ती, धमाल करतात. दिवसभर खेळ आणि दंगामस्ती केल्याने मुलांना वारंवार थकून भूक (Choclate Aappe Recipe) लागते. भूक लागल्याने पोटांत कावळे ओरडत असताना मुलांना सतत काही ना काहीतरी मस्त (How To Make Choclate Aappe) यम्मी खावेसे वाटते. मग काय मुलांच्या दिवसेंदिवस फर्माईश (Quick Chocolate Dessert Recipe) वाढतच जातात. आज काय तर आई हेच कर, आज काय तर मस्त खायला काहीतरी नवीन कर, असे आदेश सोडले जातात. पण अशावेळी दररोज नवीन पदार्थ काय करायचे या विचाराने घरच्या गृहिणीची दमछाक होते(Mini chocolate cake in appam pan).
मुलांना चॉकलेट खायला खूपच आवडते. चॉकलेट आणि चॉकलेटचे पदार्थ म्हणजे मुलांच्या अतिशय जवळचे. याच चॉकलेटचे मस्त चॉकलेटी आप्पे आपण मुलांना खायला देऊ शकतो. एरवी आपण मिश्र डाळी व भाज्या वापरुन त्यांचे पौष्टिक आप्पे मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनला देतो. परंतु सुट्टी स्पेशल काहीतरी वेगळा नवीन पदार्थ करायचा म्हटलं तर आपण मस्त चॉकलेट आप्पे झटपट तयार करु शकतो. घरच्याघरीच चॉकलेट आप्पे तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. बारीक रवा - २ कप
२. मीठ - चवीनुसार
३. तूप - १ टेबलस्पून
४. कोको पावडर - ४ टेबलस्पून
५. साखर - १ कप
६. दही - १ कप
७. दूध - १ कप
८. बेकिंग पावडर - १/२ टेबलस्पून
९. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
१०. व्हॅनिला इसेंन्स - ४ ते ५ थेंब
११. तेल - आवश्यकतेनुसार
१२. चॉकलेट सॉस - आवश्यकतेनुसार
१३. चॉकलेट स्प्रेड - आवश्यकतेनुसार
शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात बारीक रवा, तूप, चवीनुसार मीठ, कोको पावडर, साखर असे सगळे पदार्थ एकत्रित घेऊन ते चमच्याने हलवून मिक्स करून घ्यावे.
२. त्यानंतर या मिश्रणात दही, दूध घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून मिक्स करून घ्यावे.
३. आता या मिश्रणात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालावा. मग त्यात व्हॅनिला इसेंन्सचे थेंब घालावेत. आता हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. (इडली बॅटरच्या कंन्सिस्टंन्सीप्रमाणेच आप्पे बॅटरची कंन्सिस्टंन्सी असावी.) हे तयार मिश्रण अर्धा तास तसेच झाकून ठेवावे.
हिरव्यागार कैरीचा आंबट - गोड चटपटीत ठेचा! भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा...
४. आप्पे पात्र गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या आप्पे पात्रात थोडे तेल सोडून मग आप्प्याचे तयार मिश्रण यात सोडावे.
५. मग व्यवस्थित झाकून ५ ते १० मिनीटांत आप्पे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
मस्त चॉकलेटी आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हे तयार आप्पे चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट स्प्रेड सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.