Join us  

केक बनवण्यासाठी ओव्हन कशाला ? कढईचा वापर करुन झटपट बनवा तितकाच स्पॉंजी चॉकलेट केक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 6:58 PM

No Oven Chocolate Cake Recipe in Cooking Pan on Stove Top : केक बनवण्यासाठी ओव्हन असलाच पाहिजे असे गरजेचे नाही, साध्या कढईचा वापर करून देखील आपण ओव्हन सारखाच मस्त केक तयार करु शकतो..

'केक' हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच अतिशय आवडीचा पदार्थ आहे. आजकाल कोणतही छोटं - मोठं सिलेब्रेशन असो किंवा सण, समारंभ यादिवशी केक कापून आनंद द्विगुणित केला जातो. केकमध्ये देखील अनेक प्रकार असतात. मफिन्स, कप केक, क्रिम केक, पेस्ट्री असे केकचे अनेक प्रकार आपण खाल्लेच असतील. आजकाल सर्रास सगळ्याच छोटेखानी किंवा मोठ्या समारंभात केक हा लागतोच. त्यामुळे आपल्यापैकी काहीजण केक विकत ना आणता, झटपट घरीच केक बनवतात(CHOCOLATE CAKE WITHOUT OVEN EASY STEAMED CHOCOLATE CAKE AT HOME).

केक बनवण्यासाठी आपल्याला कित्येक तास किचनमध्ये अनेक पदार्थांचा घाट घालावा लागतो. इतकेच नव्हे तर केक बनवण्यासाठी खास ओव्हनची गरज (How to make a simple cake at home without oven) ही लागतेच. परंतु ओव्हन सगळ्यांकडेच असेल असे नाही, अशावेळी आपण कढईचा वापर करुन झटपट कढईमध्येच केक बनवू शकतो. हा कढई मधील केक बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अगदी उत्तम लागतो. त्याचबरोबर हा केक ओव्हनमधील केक इतकाच फुलून स्पॉंजी, मऊ, लुसलुशीत होतो. कढईचा वापर करुन ओव्हन सारखाच फुलून येणारा केक बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Chocolate Cake Without Oven Easily At Home).   

साहित्य :- 

१. मैदा - १ कप २. पिठी साखर - ३/४ कप ३. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून ४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून ५. कोको पावडर - १/४ कप ६. व्हॅनिला इसेन्स - १ टेबलस्पून ७. रिफाईंड तेल - १/४ कप ८. दूध - १ कप ९. व्हिनेगर - १ टेबलस्पून१०. चोको चिप्स - १/४ कप 

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

कृती :- 

१. एक मोठी गाळणी घेऊन त्यात मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर घालून ते सगळे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यावे. २. या चाळून घेतलेल्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, रिफाईंड तेल, दूध, व्हिनेगर घालून हे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे. ३. सगळ्यात शेवटी या बॅटरमध्ये चोको चिप्स घालून घ्यावेत. ४. हे केकचे बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ न करता मध्यम कंन्सिस्टंन्सीचे करुन घ्यावे. 

आता घरच्या अप्पे पात्रात बनवा झटपट होणारे चोको लाव्हा केक... मुलांची होईल चंगळ !!

नवरात्र स्पेशल : साबुदाण्याची खिचडी - वडे नकोसे वाटतात ? ट्राय करा उपवासाची मऊ, जाळीदार इडली, झटपट रेसिपी...

५. आता एका केकच्या भांड्याच्या तळाशी बटर पेपर लावून त्यात हे केक बॅटर ओतून घ्यावे. ६. त्यानंतर एक कढई ५ मिनिटे अगोदर प्री - हिट करून घ्यावी. त्यानंतर त्यात हे केकचे भांडे ठेवून वरून झाकण ठेवून द्यावे. ७. कढई मंद आचेवर ठेवून २५ ते ३० मिनिटे हा केक बेक होण्यासाठी ठेवून द्यावा. ८. जर आपण कढई ऐवजी ओव्हनचा वापर करणार असाल तर ओव्हनचे टेम्परेचर १८० डिग्रीवर ठेवून हा केक बेक करुन घ्या.

कुकरमध्ये केक बनवताना ५ चुका टाळा ! बेकरीसारखा मस्त सॉफ्ट, लुसलुशीत केक होईल झटपट तयार... 

ओव्हनप्रमाणेच कढईमध्ये झटपट होणारा चॉकलेट केक खाण्यासाठी तयार आहे. हा केक संपूर्ण थंड झाल्यावर त्याचे तुकडे करुन सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती