Join us  

विकेंड स्पेशल : फक्त ६० सेकंदात घरच्याघरी करता येईल कॉफी मग केक, मूड होईल मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 2:26 PM

How To Make Chocolate Chip Coffee Mug Cake In Microwave Within 60 Seconds : कॉफी मग केक हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि खाण्याचा आनंद मोठा

'केक' हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच अतिशय आवडीचा पदार्थ आहे. आजकाल कोणतही छोटं - मोठं सिलेब्रेशन असो किंवा सण, समारंभ यादिवशी केक कापून आनंद द्विगुणित केला जातो. केकमध्ये देखील अनेक प्रकार असतात. मफिन्स, कप केक, क्रिम केक, पेस्ट्री असे केकचे अनेक प्रकार आपण खाल्लेच असतील. आजकाल सर्रास सगळ्याच छोटेखानी किंवा मोठ्या समारंभात केक हा लागतोच. त्यामुळे आपल्यापैकी काहीजण केक विकत ना आणता, झटपट घरीच केक बनवतात. केक बनवण्यासाठी आपल्याला कित्येक तास किचनमध्ये अनेक पदार्थांचा घाट घालावा लागतो. इतकी मेहेनत करावी लागली तरी आपण काहीवेळान केक घरीच बनवतो.

कित्येकदा आपल्याला जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्यासमोर जर कोणी केक आणून दिला तर तो खाण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही. आपल्या या गोड खाण्याच्या छोट्याच्या इच्छेसाठी बाहेरुन विकतचा केक आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी झटपट कॉफी मग केक तयार करु शकतो. हा कॉफी मग केक बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अगदी उत्तम लागतो. त्यामुळे यंदाच्या विकेंडला घरांतील मुलांना किंवा आपल्या छोट्याशा गोड खाण्याच्या इच्छासाठी घरीच चटकन कॉफी मग केक बनवा(How To Make Chocolate Chip Coffee Mug Cake In Microwave Within 60 Seconds).   

साहित्य :- 

१. मैदा - ४ चमचे २. कोको पावडर - २ चमचे ३. साखर - १ + १/२ टेबलस्पून ४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून ५. तेल - २ टेबलस्पून ६. बदामाचे दूध - ४ टेबलस्पून७. चॉको चिप्स - २ टेबलस्पून८. पिठीसाखर - १ टेबलस्पून 

घरी केक छान फुलत नाही? ९ टिप्स, केक होईल हलका - परफेक्ट छान...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग सोडा, तेल, बदामाचे दूध, चॉको चिप्स असे सगळे जिन्नस घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे.  २.  आता हे तयार झालेले केकचे मिश्रण एका मोठ्या उंच कॉफी मगमध्ये भरुन घ्यावे. लक्षात ठेवा मिश्रण कपच्या एकदम काठोकाठ भरु नका. कारण केक वरुन फुलून येण्यासाठी थोडी जागा ठेवावी. 

३. आता हा कॉफी मग केक मायक्रोव्हेवमध्ये ६० सेकंदांसाठी बेक होण्यासाठी ठेवून द्यावा. ४. ६० सेकंदांनंतर केक बेक होऊन तयार झाल्यानंतर, एका गाळणीत थोडीशी पिठी साखर घेऊन आपल्या आवडीप्रमाणे त्यावर भुरभुरवून घ्यावी. 

उरलेला केक लवकर शिळा होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, फ्रीजमध्ये केक राहील फ्रेश...

 झटपट तयार झालेला कॉफी मग केक खाण्यासाठी तयार आहे.

 

टॅग्स :अन्नपाककृती