Join us  

आता कुकरमध्ये करा झटपट छोले पुलाव! रेसिपी सोपी, रात्रीच्या जेवणाला करा चमचमीत बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 2:29 PM

How To Make Kabuli Chana Pulav Recipe : नेहमीचा भात खिचडी खाऊन वैतागलात तर हा छोटे पुलाव करा, कमी वेळात उत्तम पदार्थ.

पुलाव ही भारतामध्ये सर्वत्र बनवली जाणारी आणि खाल्ली जाणारी लोकप्रिय डिश आहे. पुलाव हा कमी वेळात झटपट होणारा आणि त्याच्या स्वादामुळे सर्वांचे मन तृप्त करणारा, बनवायला सोपा पदार्थ आहे. ही रेसिपी सोपी, झटपट आणि व्यस्त लोकांसाठी लगेच बनणारी डिश आहे. विविध भाज्या आणि मसाले एकत्रित करुन चविष्टय पुलाव चटकन बनवता येतो. हैदराबादी पुलाव, व्हेजिटेबल पुलाव, शाही पुलाव, नवरत्न पुलाव असे पुलावचे असंख्य प्रकार घरच्या घरी बनवता येतात.   

बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी अचानक कोणीतरी पाहुणे येतात, आणि हे पाहुणे जेवून जाण्याचा बेत करतात. त्यामुळे अशावेळी अचानक काय जेवण बनावयाचं असा गोंधळ उडतो. अशावेळी आपण चटकन तांदूळ, भाज्या, अनेक मसाले एकत्र करुन एकच चवदार पुलाव बनवतो. पुलाव बनवण्यासाठी काही भाज्या, खडे मसाले लागतात, ते शक्यतो आपल्या घरांमध्ये आधीपासूनच सहज उपलब्ध असतात. यामुळे पाहुणे आल्यावर आपण हमखास पुलाव बनवतोच. शक्यतो छोटे - मोठे समारंभ, छोटेखानी पार्टी, सण- समारंभ, उत्सव यांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणाच्या यादीत पुलाव भात हा हमखास असतोच. दररोजचा तोच - तोच पुलाव खाऊन कंटाळा आला असल्यास आपण पटकन तयार होणारा छोले पुलाव घरच्या घरी करु शकतो(How To Make Kabuli Chana Pulav Recipe).

साहित्य :- 

१. छोले - १.५  कप ( भिजवलेले)२. तेल - ३ टेबलस्पून ३. तमालपत्र - १ ४. जिरे - १/२ टेबलस्पून ५. कांदा - १ कप (पातळ उभा चिरलेला)६. टोमॅटो - १ कप ७. हळद - १/२ टेबलस्पून ८. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ९. कोथिंबीर - १ टेबलस्पून १०. मीठ - चवीनुसार ११. हिरवी मिरची - २ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)१२. तांदूळ - १ + १/२ कप १३. पाणी - १ + १/२ कप १४. गरम मसाला - १ टेबलस्पून १५. तूप - १ टेबलस्पून १६. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून 

ताज्या करकरीत कैरीची करा ‘फोडणीची कैरी’; तोंडी लावायला झटपट पदार्थ- उन्हाळा होईल सुसह्य...

कृती :- 

१. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप घालावे. २. त्यानंतर त्यात तमालपत्र, जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उभा पातळ चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट, टोमॅटो घालून सगळे जिन्नस परतून घ्यावे. ३. आता त्यात हळद, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, भिजवून घेतलेले छोले, चवीनुसार मीठ, १/२ कप पाणी घालून सगळे जिन्नस चमच्याने ढवळून घ्यावेत. त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.   

काहीतरी गारेगार खावेसे वाटते? करा झटपट फ्रूट कस्टर्ड, करायला सोपे आणि खायला मस्त...

४. त्यानंतर त्यात धुवून घेतलेला तांदूळ व १/२ कप पाणी घालून घ्यावे. चमच्याने सगळे जिन्नस एकत्रित करुन ढवळून घ्यावे. ५. आता त्यात गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. 

आपला छोले पुलाव खाण्यासाठी तयार आहे. हा छोले पुलाव खाण्यासाठी सर्व्ह करताना यासोबत पापड व बुंदी रायत तोंडी लावण्यासाठी द्यावे.

टॅग्स :अन्नपाककृती