Join us  

अर्धी वाटी ओलं खोबरं आणि फक्त २ चमचे तेल, करा कुरकुरीत कोकोनट बॉल्स! १० मिनिटांत होणारा पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 3:11 PM

How to Make Coconut Balls for Starter - Note down Recipe जेवणात काहीतरी कुरकुरीत झटपट चटकमटक हवं तर करुन पाहा हे कोकोनट बॉल्स

जेवायला गेल्यानंतर आपण सुरुवातीला वेजिटेरियन स्टार्टर ऑर्डर करतो. स्टार्टरमध्ये आपण पनीर - ६५, वेज कबाब, स्प्रिंग रोल, फ्रेंच फ्राइज आणि मसाला पापड हे पदार्थ ऑर्डर करतो. त्यानंतर आपण मेन मिल खाण्यासाठी सुरुवात करतो. मात्र, अनेकदा तेच तेच पनीरचे स्टार्टर खाऊन कंटाळा येतो. जर आपल्याला स्टार्टरमध्ये काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर, कोकोनट बॉल्स ही रेसिपी ट्राय करून पाहा.

कोकोनट बॉल्स बनवायला सोपी आणि कमी साहित्यात तयार होते. हा पदार्थ करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. यासह कमी तेलात ही रेसिपी तयार होते. जर आपल्याला स्नॅक्समध्ये किंवा स्टार्टरमध्ये काहीतरी हटके, हेल्दी आणि चविष्ट खायचं असेल तर, कोकोनट बॉल्स ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(How to Make Coconut Balls for Starter - Note down Recipe).

कोकोनट बॉल्स करण्यासाठी लागणारं साहित्य

अर्धी वाटी ओलं खोबरं

मीठ

लाल तिखट

हळद

गरम मसाला

धणे पूड

बारीक चिरलेली कोथिंबीर - कडीपत्ता

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

बेसन

तेल

कृती

सर्वप्रथम, अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घ्या. किसलेलं खोबरं एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून मिक्स करा.

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

नंतर त्यात २ चमचे बेसन घालून मिक्स करा, व त्याचे छोटे -  छोटे बॉल्स तयार करा. पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बॉल्स घालून शॅलो फ्राय करून घ्या. अशा प्रकारे कोकोनट बॉल्स खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स