जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण ताटात अनेकदा पापड, लोणचे, चटण्या घेतो. चटणी अनेक प्रकारची केली जाते. ओली व सुकी चटणी लोकं आवडीने खातात. तिळाची, शेंगदाण्याची, खोबऱ्याची चटणी महाराष्ट्रात फार फेमस आहे. चटणी ताटात पडताच साध्या जेवणाची रंगत दुपट्टीने वाढते. व जेवणारा व्यक्ती दोन घास एक्स्ट्रा खातो. जर आवडीची भाजी ताटात नसेल तर, लोकं चटणीसोबत चपाती, भात फस्त करतात.
आपण खोबऱ्याची ओली चटणी ट्राय करून पाहिली असेल, पण सुकी चटणी कधी करून पाहिली आहे का? खोबऱ्याच्या अर्ध्या वाटीत चटकदार चटणी ५ मिनिटात रेडी होते. चला तर मग या चटकदार चटणीची कृती पाहूयात(How to make Coconut Chutney Recipe at Home).
खोबऱ्याची सुकी चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
अर्धी वाटी सुकं खोबरं
तेल
जिरं
लसणाच्या पाकळ्या
सुक्या लाल मिरच्या
१ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म
पांढरे तीळ
मीठ
कृती
सर्वप्रथम, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून घ्या. एका कढईत एक चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, लसणाच्या ७ ते ८ पाकळ्या, खोबऱ्याचे काप, ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या, अर्धी वाटी पांढरे तीळ घालून भाजून घ्या.
१ वाटी बेसन - १ कप पाणी, यंदाच्या पावसात खाऊनच पाहा चमचमीत ‘झुणका वडी!’
साहित्य भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या, साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या. व ही चटणी एका हवाबंद डब्यात झाकून ठेवा. अशा प्रकारे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी.