Join us  

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 2:51 PM

How To Make Coconut Mango Milkshake : Homemade Recipe :उन्हाळ्यातील एक मस्त थंडगार पदार्थ घरच्या घरी झटपट बनवू शकतो.

उन्हाळ्यांत आपल्याला काही ना काही थंडगार खावेसे वाटते. उन्हाळ्यात आपण शहाळ्याचे पाणी पिणे अधिक पसंत करतो. शहाळ्याच्या पाण्याने आपल्याला उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनच्या समस्येपासून बचाव होतो. काही पदार्थ असे असतात की आपण ते एका ठराविक ऋतूंमध्येच खातो. उन्हाळ्यात आपण थंडगार शीतपेय, सरबत, मिल्कशेक आवडीने पितो. उन्हाळ्यात येणारं आंबा हे फळ तर आपल्याला सगळ्यांनाच फार प्रिय आहे. उन्हाळ्यात येणारा आंबा खाण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पहावी लागते. वर्षभर वाट पाहिल्यानंतर येणार आंबा हे फळ खाऊन मन अगदी तृप्त होत. 

उन्हाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत आंब्याचं नाव पाहिलं येत त्यानंतर शहाळ्याचं पाणी. हे दोन्ही पदार्थ आपण उन्हाळ्यात आवडीने खातो. उन्हाळ्यात आपण आंब्याचे विविध पदार्थ बनवून खातोच. याशिवाय वाढत्या उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण शहाळ्याचे पाणी अवश्य पितो. या दोन्ही पदार्थांचा वापर करुन आपण उन्हाळ्यातील एक मस्त थंडगार पदार्थ घरच्या घरी झटपट बनवू शकतो. शहाळ्याचे पाणी, त्यातील मलई, आंबा यांचा वापर करुन थंडगार कोकोनट मँगो मिल्कशेक बनवू शकतो(How To Make Coconut Mango Milkshake : Homemade Recipe).  

साहित्य :- 

१. शहाळ्याचे पाणी - १ ग्लास २. शहाळ्याची मलई - १ कप ३. दूध - १ कप ४. फ्रेश क्रिम - २ ते ३ टेबलस्पून ५. व्हॅनिला आईस्क्रीम - १ कप ६. आंब्याचे लहान लहान तुकडे - १ कप ७. ड्रायफ्रूट्सचे काप - २ ते ३ टेबलस्पून  

लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे लहान तुकडे घेऊन त्यात शहाळ्याची मलई घालावी. २. त्यानंतर त्यात शहाळ्याचे पाणी, दूध, फ्रेश क्रिम, व्हॅनिला आईस्क्रीम घालावे. 

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल...

३. हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित फिरवून घ्यावेत. ४. आता हे तयार झालेले कोकोनट मँगो मिल्कशेक रिकामी शहाळ्यात ओतून त्यावर गार्निशिंगसाठी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे काप किंवा आंब्यांचे लहान लहान तुकडे करुन हे कोकोनट मँगो मिल्कशेक पिण्यासाठी सर्व्ह करावे. 

थंडगार कोकोनट मँगो मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती