नाश्त्याला रोज नवीन काय बनवावं असा प्रश्न घराघरातील गृहिणींना पडतो. पोहे, डोसे खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. तुम्हालाही असंच काहीतरी नवीन खावंस वाटत असेल तर करवंटी इडली तुम्ही ट्राय करू शकता. इडल्याचे बरेच प्रकार आहे. (Cooking Hacks & Tips) हे प्रकार बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही, फक्त करवंट्या लागतील. त्यासाठी नारळाच्या कवचाला ३० मिनिटे पाण्यात बुडवून थोडं सॉफ्ट होऊ दया आणि नंतर कवचाच्या आतील बाजूस तेल लावा आणि पिठात घाला आणि स्टीमरमध्ये व्यवस्थित शिजवा. (How to Make Coconut Shell Idli)
जाळीदार करवंटी इडलीची रेसेपी
१) जाळीदार, मऊ इडली करण्यासाठी तांदूळ आणि उडीदाची डाळ सम प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात वेगवेगळं भिजत ठेवा.
२) दुसऱ्या दिवशी तांदूळ, डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून पीठ दळून घ्या.
३) त्यात सोडा आणि मीठ घालून पीठ ७ ते ८ तास आंबवण्यासाठी ठेवा
४) त्यानंतर करवंट्यांना तेल लावून पीठ घालून इडल्या शिजवून घ्या. तयार आहेत गरमागरम करवंटी इडल्या. या इडल्या तुम्ही चटणी किंवा सांभारबरोबर खाऊ शकता.