Lokmat Sakhi >Food > चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

How to Make Tasty Cold Coffee: थंडीचे दिवस असले तरी गुलाबी थंडीत कोल्ड कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते.. म्हणूनच तर ही बघा चवदार कोल्ड कॉफी बनविण्याची सिक्रेट रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 03:05 PM2022-11-17T15:05:27+5:302022-11-17T15:07:26+5:30

How to Make Tasty Cold Coffee: थंडीचे दिवस असले तरी गुलाबी थंडीत कोल्ड कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते.. म्हणूनच तर ही बघा चवदार कोल्ड कॉफी बनविण्याची सिक्रेट रेसिपी..

How to make coffee syrup for making tasty cold coffee? Secret recipe of making delicious cold coffee | चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

Highlightsचवदार कोल्ड कॉफी करायची असेल, तर त्यामागचं हे खास सिक्रेट एकदा जाणून घ्या.

थकवा घालवून पुन्हा फ्रेश होण्यासाठी अनेक जण जसे हॉट- कडक कॉफी किंवा चहा घेतात, तसंच थोडंसं चिल करायला, रिलॅक्स व्हायला कॉफी लव्हर्स (coffee lovers) कोल्ड कॉफी (cold coffee) पिण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे आता सध्या थंडीचे दिवस असले तरी दुपारच्या वेळी कोल्ड कॉफी पिण्याऱ्यांची संख्या काही कमी नाही. थंडीमध्ये थंडगार आईस्क्रिम खाण्यात जी वेगळीच मजा असते, अशी मजा कॉफी लव्हर्सला कोल्ड कॉफी घेण्यातही वाटते. म्हणूनच चवदार कोल्ड कॉफी (How to Make Tasty Cold Coffee) करायची असेल, तर त्यामागचं हे खास सिक्रेट एकदा जाणून घ्या.

 

मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हे सिक्रेट शेअर केलं आहे. कोल्ड कॉफी अगदी विकतच्यासारखी चवदार करायची असेल आणि ते ही अवघ्या काही मिनिटांत तर कॉफी सिरप तयार करून ठेवा,

गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

असं त्यांनी सुचवलं आहे. कोल्ड कॉफीची टेस्ट उत्तम जमण्यासाठी कॉफी सिरप कसं तयार करायचं याची रेसिपी त्यांनी सांगितली असून हे सिरप एकदा तयार करून ठेवलं की तुम्ही ते पुढील १५ दिवस वापरू शकता.

 

कसं तयार करायचं कॉफी सिरप?
१. यासाठी सगळ्यात आधी एक वाटी साखर, एक वाटी पाणी एका पातेल्यात एकत्र करून घ्या.

२. हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा आणि ४ ते ५ मिनिटे उकळू द्या.

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ५ मिनिटांचा एक सोपा उपाय, नेहमीच दिसाल तरुण

३. या उकळलेल्या मिश्रणात ३ टेबलस्पून कॉफी पावडर टाका. आणि पुन्हा एकदा उकळी येऊ द्या.

४. त्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

५. जेव्हा कोल्ड कॉफी करायची असेल तेव्हा पाव कप कॉफी सिरप, एक कप दूध, १ टीस्पून कॉफी पावडर आणि बर्फाचे काही तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका आणि फिरवून घ्या.

६. झटपट चवदार काेल्ड कॉफी झाली तयार. 


 

Web Title: How to make coffee syrup for making tasty cold coffee? Secret recipe of making delicious cold coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.