Join us

कोथिंबीर पावडर रेसिपी: हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळते; करुन ठेवा वर्षभर टिकणारी कोथिंबीर पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 19:02 IST

How To Make Coriander Powder At Home: कोथिंबिरीची पावडर कशी करायची आणि वर्षभर ती कशी टिकवून ठेवायची याची ही एक सोपी रेसिपी पाहा (simple recipe of making coriander powder at home)

ठळक मुद्देकोथिंबीरीची ही पावडर वरण, भाज्या, ढोकळा, इडल्या, ताक, पराठे किंवा इतर रेसिपींमध्येही तुम्ही वापरू शकता. त्या पदार्थाला कोथिंबीरीचा खूप छान सुवास लागेल.

सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आतापासून ते साधारण जानेवारीपर्यंत कोथिंबीर आणि इतर पालेभाज्या आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. शिवाय हिवाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्या इतर ऋतूंपेक्षा खूप फ्रेश, टवटवीत, हिरव्यागार असतात. हिवाळा सरला की नंतर मात्र उन्हाळ्यात पालेभाज्या खूप महाग होतात. कोथिंबीरच्या एका जुडीसाठी तर अगदी २५ ते ३० रुपये मोजावे लागतात. शिवाय एवढे पैसे देऊनही कोथिंबीर छान फ्रेश, हिरवीगार मिळतच नाही. म्हणूनच तेव्हा एवढी महाग कोथिंबीर घेण्यापेक्षा आता ती स्वस्त मिळते आहे तर थोडी जास्त प्रमाणात घ्या आणि वर्षभर टिकणारी कोथिंबीर पावडर तयार करा (how to make coriander powder at home?). बघा कोथिंबीर पावडर करण्याची अतिशय सोपी रेसिपी.(simple recipe of making coriander powder at home)

 

घरच्याघरी कोथिंबीर पावडर कशी करावी?

कोथिंबीर पावडर तयार करायची असेल तर त्यासाठी तुम्ही जी कोथिंबीर घ्याल ती अगदी फ्रेश हिरवीगार बघून घ्या.

३ चुका केल्या तर केस गळणारच!! डोक्याला टक्कल पडू द्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हा

यानंतर कोथिंबीर व्यवस्थित निवडा आणि तिच्यातली सडकी किंवा थोडीशी खराब झालेली, पिवळट पानं लगेच वेगळी काढून घ्या.. 

निवडून झालेली कोथिंबीर धुवून घ्या किंवा मग ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर आता आपल्याला ही कोथिंबीर पुर्णपणे वाळवायची आहे. यासाठी उन्हामध्ये एक स्वच्छ सुती कपडा अंथरा आणि त्यावर स्वच्छ केलेली कोथिंबीर पसरवून ठेवा.

 

हिवाळ्यात तसे बऱ्यापैकी कडक ऊन असते. त्यामुळे ५ ते ६ तासांत कोथिंबीर बरीच वाळेल. जर नाही वाळली तर संध्याकाळच्या वेळी ती एखाद्या पसरट भांड्यात टाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दोन- तीन तास तिला ऊन द्या. यानंतर कोथिंबीर अगदी व्यवस्थित वाळलेली असेल.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

कोथिंबीर व्यवस्थित वाळली की नाही हे तपासण्यासाठी ती थोडी हातावर घ्या आणि चुरून पाहा. जर तिची पावडर झाली तर मग ती आपल्याला हवी तशी पुर्णपणे वाळली आहे हे समजावे. अशा पद्धतीने हातानेच तुम्ही ती चुरून घेऊन तिची पावडर करून ठेवू शकता किंवा मग ती जशीच्यातशी डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा तिची पावडर करा. 

कोथिंबीरीची ही पावडर वरण, भाज्या, ढोकळा, इडल्या, ताक, पराठे किंवा इतर रेसिपींमध्येही तुम्ही वापरू शकता. त्या पदार्थाला कोथिंबीरीचा खूप छान सुवास लागेल.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.