Lokmat Sakhi >Food > कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट

कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट

How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe : कोथिंबीरीची देठं फेकून देण्याआधी ही रेसिपी पाहा, अशी चटपटीत चटणी कधी खाल्लीच नसेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2024 12:27 PM2024-03-01T12:27:38+5:302024-03-01T21:59:49+5:30

How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe : कोथिंबीरीची देठं फेकून देण्याआधी ही रेसिपी पाहा, अशी चटपटीत चटणी कधी खाल्लीच नसेल..

How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe | कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट

कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट

चटणी खायला खूप चविष्ट लागते. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण चटणी, पापड किंवा लोणची खातो. चटणीमुळे जेवणाची रंगत वाढते. शिवाय चटणीमुळे आपण दोन घास एक्स्ट्रा खातो. चटणी दोन प्रकारची केली जाते. एक ओली आणि एक सुकी. आपण खोबऱ्याची, तिळाची, शेंगदाण्याची चटणी खाल्लीच असेल (Coriander Chutney). पण आपण कधी कोथिंबीरीच्या देठाची चटणी खाऊन पाहिली आहे का?

कोथिंबीरीचा वापर आपण डिश सजवण्यासाठी करतो, आणि देठं फेकून देतो. पण देठं फेकून देण्याआधी ही रेसिपी पाहा (Cooking Tips). कोथिंबीरीच्या देठाचा वापर करून आपण चटपटीत चटणी तयार करू शकता. ही चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून किंवा स्नॅक्ससोबत देखील खाल्ली जाऊ शकते(How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe).

कोथिंबीरीच्या देठाची चटपटीत चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

कांदा

टोमॅटो

लसणाच्या पाकळ्या

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

तेल

उडीद डाळ

लाल सुक्या मिरची

ओलं खोबरं

चिंच

मीठ

कृती

सर्वप्रथम, कोथिंबीर निवडून घ्या. त्याची पानं वेगळी करा, आणि देठं वेगळी करा. देठांचा वापर करण्याआधी पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्या. एका प्लेटवर टिश्यू पेपर ठेवा, त्यावर देठं पसरवून ठेवा.

आता एक कांदा, एक टोमॅटो, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या चिरून घ्या. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा उडीद डाळ, २ ते ३ लाल सुक्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या.

कोशिंबीर नेहमीचीच, करून पाहा काकडीचा खमंग ढोकळा; इतका कुल की असा ढोकळा आवडेल सर्वांना

नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे, चिंचेचा एक तुकडा आणि कोथिंबीरीचे देठं घालून सर्व साहित्य भजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप पाणी घाला आणि साहित्य ५ मिनिटांसाठी शिजवून घ्या. भाजलेलं साहित्य एका बाऊलमध्ये काढा. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून पेस्ट तयार करा. अशा प्रकारे कोथिंबीरीच्या देठाची चटणी खाण्यासाठी रेडी.  

Web Title: How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.