Lokmat Sakhi >Food > कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर

कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर

Food And Recipe: भावनगरी शेव (Bhavanagari Shev) हा एक खंमग प्रकार यंदा दिवाळीत करून बघा. करायला अगदी सोपा आणि खूप दिवस टिकेल असा चवदार पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 05:29 PM2022-10-21T17:29:47+5:302022-10-21T17:30:09+5:30

Food And Recipe: भावनगरी शेव (Bhavanagari Shev) हा एक खंमग प्रकार यंदा दिवाळीत करून बघा. करायला अगदी सोपा आणि खूप दिवस टिकेल असा चवदार पदार्थ.

How to make crispy, crunchy Bhavanagari Shev? Easy and simple recipe of making shev for diwali | कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर

कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर

Highlights यंदा दिवाळीत जर एखादा नविन, वेगळा, खमंग पण तेवढाच सोपा पदार्थ करून बघायचा असेल तर भावनगरी शेव एकदा ट्राय करून बघा.

शनिवार- रविवार असे सुटीचे दिवस बघून अनेक घरांमध्ये फराळाचे विविध पदार्थ तयार करण्याचा बेत आखला जात आहे. चिवडा, लाडू, शेव (Bhavanagari Shev), चकली, अनारसे अशा पेटंट पदार्थांनी डबे भरले की मग कसा दिवाळीचा फिल येतो. यंदा दिवाळीत (diwali faral) जर एखादा नविन, वेगळा, खमंग पण तेवढाच सोपा पदार्थ करून बघायचा असेल तर भावनगरी शेव (How to make crispy, crunchy Bhavanagari Shev?), हा शेवचा प्रकार एकदा ट्राय करून बघा. शेव अगदी खुसखुशीत, कुरकुरीत होण्यासाठी परफेक्ट माप कसं असावं, रेसिपी कशी करायची, याविषयीची माहिती औरंगाबाद येथील राजश्री अग्रवाल यांनी त्यांच्या shree Cooking and Baking Class या यु ट्यूब चॅनलवर शेअर केली आहे. 

 

भावनगरी शेव रेसिपी
साहित्य

बेसन २०० ग्रॅम, 
पापड खार २ ग्रॅम

सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?
मीठ चवीनुसार, 
हिंग १ ग्रॅम, 
ओवा २ ग्रॅम, 
तेल ६५ ग्रॅम, 
पाणी ७० ग्रॅम.

 

कृती
१. एक बाऊल घ्या आणि त्यात बेसन चाळून घ्या. 

२. त्यानंतर मीठ, हिंग, पापड खार या गोष्टीही चाळून घ्या. त्यानंतर त्यात ओवा टाका. सगळे मिश्रण कोरडे असतानाच एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या.

३. त्यानंतर त्यात सामान्य तापमानावर असणारं तेल टाका. तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या.

४. त्यानंतर त्यात हळूहळू पाणी टाका आणि पीठ भिजवा. पीठ भिजवताना त्यात गोळे होणार नाहीत, याची काळजी घ्या.

दिवाळीची साफसफाई, तळणं यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात ४ उपाय

५. पीठ थोडंसं घट्ट भिजवा आणि २ ते ३ मिनिटे चांगलं मळून घ्या. जेणेकरून शेव कोरडी पडणार नाही आणि अगदी कुरकुरीत होईल.

६. पीठ खूप जास्त भिजवलं असेल तर एखादा सुती कपडा ओला करून पिठावर झाकून ठेवा. जेणेकरून पीठ सुकणार नाही.

७. आता हे पीठ शेव करण्याच्या सोऱ्यात घाला आणि शेव तळून घ्या.

८. शेव तळताना गॅस मंद किंवा मोठा नसावा. मध्यम आचेवर शेव तळून घ्यावी. 


 

Web Title: How to make crispy, crunchy Bhavanagari Shev? Easy and simple recipe of making shev for diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.