Join us  

क्रिस्पी- क्रंची व्हेज बॉल्स, भरपूर भाज्यांचे पोषण आणि पदार्थ चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 6:18 PM

Food and recipe: मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, मग हे क्रिस्पी- क्रंची व्हेज बॉल्स (How to make crispy crunchy veg balls) त्यांना देऊन बघाच... मिटक्या मारत खातील सगळ्या भाज्या!

ठळक मुद्दे मुलांना हव्या तेवढ्या भाज्या घाऊ घालण्यासाठी ही रेसिपी अगदी मस्त आहे..

नाश्ता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून काही वेगळं खावं वाटलं, किंवा घरी असलेल्या एखाद्या छोटेखानी पार्टीसाठी काहीतरी वेगळं, चटकदार आणि झटपट होणारं स्टार्टर करायचं असेल, तर त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. शिवाय या रेसिपीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एरवी वेगवेगळ्या भाज्यांकडे पाहून नाकं मुरडणारी मुलं या व्हेज बॉल्समध्ये (crispy crunchy veg balls recipe) असणाऱ्या भाज्या मात्र अगदी मिटक्या मारत फस्त करतात.. त्यामुळे मुलांना आपल्याला हव्या तेवढ्या भाज्या घाऊ घालण्यासाठी ही रेसिपी अगदी मस्त आहे.. इन्स्टाग्रामच्या shyamliskitchen या पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. 

 

व्हेज बॉल्स करण्यासाठी लागणारं साहित्य६ ते ७ ब्रेड स्लाईस, कोबी, सिमला मिरची, कांदा हे सगळं बारीक चिरून प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी, किसलेलं गाजर अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घेऊ शकता. तसेच बारीक चिरलेला लसूण एक टेबलस्पून, बारिक चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या, किसलेलं अद्रक, चाट मसाला, गरम मसाला, मिरेपूड, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी रवा किंवा तांदळाचं पीठ.

 

कसे करायचे व्हेज बॉल्स (How to make veg balls)- व्हेज बॉल्स तयार करण्यासाठी ब्रेडच्या स्लाईस एकेक करून पाण्यात बुडवा. त्यानंतर त्या पिळून त्यांच्यातलं पाणी काढून टाका आणि ब्रेडचे भिजलेले गोळे एका बाऊलमध्ये घ्या.- त्यामध्ये आता वरच्या सगळ्या भाज्या, अद्रक- लसूण- मिरची, मीठ आणि मसाले तसेच मैदा आणि रवा किंवा तांदळाचं पीठ टाका.- हे मिश्रण भिजवा. हे मिश्रण भिजण्यासाठी खूप पाणी लागत नाही. त्यामुळे अगदी चमच्याने हवं तेवढंच पाणी टाका आणि मिश्रण जरा घट्टच भिजवा.

- आता कढईमध्ये तेल टाकून ती गॅसवर तापत ठेवा.- हाताला थोडं तेल लावून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवा.- तेल तापलं की हे सगळे बॉल मध्यम आचेवर डिप फ्राय करा.- चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या आणि त्यानंतर टोमॅटो सॉस, मेयोनीज यासोबत हे क्रिस्पी- क्रंची व्हेज बॉल्स खाण्याचा आनंद घ्या.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.