सकाळी झटपट नाश्त्याला काय बनवाव असा प्रश्न सगळ्यांना पडतो. पोहे, उपमा, शिरा खाऊन वीट येऊ लागतो.(Crispy dosa without fermentation) इडली-डोसा बनवायचं म्हटलं तर त्याला पुरेसा वेळ हवा. डाळ-तांदूळ भिजवण्यापासून त्याच मिश्रण तयार करण्यापर्यंत. (How to make crispy dosa in one hour) सहसा इडली-डोसे हे सुट्टीच्या दिवशी बनवले जातात. अदल्या दिवशी पीठ तयार करुन दुसऱ्या दिवशी बनवावे लागते. त्यात पीठ व्यवस्थित फुगले किंवा आंबले नाही तर डोसे- इडली नीटसे बनत नाही. (Instant dosa recipe without soda)
अचानक डोसा-इडली खायची इच्छा झाली तर ते सहज बनवता येत नाही. रव्याचा डोसा बनवायचा म्हटलं तर सोडा-इनो वापरावा लागतो. पण अवघ्या तासाभरात डाळ- तांदळाचा कुरकुरीत डोसा बनवता येऊ शकतो.(No soda no eno dosa recipe) त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तसेच डोसा तव्याला चिकटू नये यासाठी आपल्याला काय करायला हवे हे देखील पाहूया. घाईच्या वेळेत किंवा सकाळच्या नाश्त्यात तासाभरात बनवता येणारा डाळ-तांदळाचा कुरकुरीत डोसाची रेसिपी पाहूया. (quick dosa batter for breakfast)
प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा बनवाल? ५ सोप्या टिप्स रवा चिकट होणार नाही, प्रमाण अचूक- चवही उत्तम
साहित्य :-
तांदूळ - २ कप
उडीद डाळ - ३/४ कप
पिवळी मूग डाळ- ३/४ कप
पोहे - १ कप
मीठ - चवीनुसार
बारीक रवा - २ चमचे
तेल - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी कढईमध्ये तांदूळ, उडीद डाळ, मूगाची डाळ आणि पोहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या.
2. त्यानंतर त्यात कोमट किंवा हलके गरम पाणी घालून अर्धा तास धान्य भिजत ठेवा. आता पाणी निथळून मिक्सच्या भांड्यात धान्य बारीक वाटून घ्या.
3. मिश्रण भांड्यात चांगले फेटून त्यात बारीक रवा घाला. चवीपुरता मीठ घालून चांगले एकजीव करा. १० मिनिटे भिजत ठेवा.
4. त्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घ्या. डोसे बनवण्यासाठी तवा घेऊन त्यावर चमचाभर तेल तव्यावर घालून टिश्यूपेपरने पुसून घ्या.
5. मंद आचेवर गॅस ठेवून थोडे पाणी शिंपडा. पाणी सुकल्यानंतर डोशाचे पीठ तव्यावर पसरवून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवल्यास जाळीदार डोसा तयार होईल.
6. डोशाचा कडा सुटल्यानंतर तेल बाजूने टाका. दीड ते दोन मिनिटांनी डोसाचा रंग बदलेल. तयार होईल कुरकुरीत डोसा
7. डोसा बनवताना गॅस गरम असतो अशावेळी पाणी शिंपडून डोसे तयार करा. तवा जास्त गरम झाल्यास गॅस बंद करुन मिश्रण पसरवा.