आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Style Dosa) खायला आवडतात. इडली, डोसा, मेदू वडा, डाळ वडा हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. शिवाय हे पदार्थ हेवी नसून, पचायला हलके असतात. यामुळे वजन तर वाढत नाही, पण आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण इडली, डोसा करताना डाळ-तांदूळ भिजत घालायला लागते. या सगळ्यात साधारण २ दिवस जातात.
साहित्यांचे प्रमाण शिवाय पीठ भिजवण्याची पद्धत माहित झाली की, इडली-डोसे व्यवस्थित साऊथ इंडियन स्टाईल तयार होतात. पण बऱ्याचदा साहित्यांचे प्रमाण बिघडते, किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेत गडबड होते. ज्यामुळे पीठ नीट फरमेण्ट होत नाही (Cooking Tips). जर आपल्याला साऊथ इंडियन स्टाईल जाड तांदुळाचे डोसे तयार करायचे असतील तर, ही रेसिपी फॉलो करून पाहा. योग्य साहित्यांचा वापर करून कुरकुरीत-टेस्टी डोसे तयार होतील(How To Make Crispy DOSA South Indian Style).
जाड तांदुळाचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य(Dosa Recipe in Marathi)
उडीद डाळ
जाड तांदूळ
मेथी दाणे
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ३ कप जाड तांदूळ घ्या. नंतर त्यात एक कप उडीद डाळ आणि २ चमचे मेथी दाणे घालून मिक्स करा. नंतर त्यात ४ कप पाणी घालून डाळ-तांदूळ धुवून घ्या. नंतर त्यात ४ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा, व डाळ-तांदूळ ७ ते ८ तासांसाठी भिजत ठेवा.
७ तास झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले डाळ-तांदूळ घेऊन त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या, व त्यावर झाकण ठेवा. हे पीठ साधारण ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. बऱ्याचदा हिवाळ्यात बॅटर लवकर फरमेण्ट होत नाही. अशा वेळी आपण अधिक वेळ फरमेण्टेशनसाठी ठेवू शकता.
बॅटर फरमेण्ट झाल्यानंतर, थोडं पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर थोडे तेल पसरवून, चमच्याने बॅटर घालून पसरवा. थोड्या वेळानंतर डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे साऊथ इंडियन पद्धतीचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.