Lokmat Sakhi >Food > ग्रेव्हीत पनीर घालत्यावर मऊ पडते? एक सोपी टीप, पनीर राहील क्रिस्पी, कुरकुरीत.

ग्रेव्हीत पनीर घालत्यावर मऊ पडते? एक सोपी टीप, पनीर राहील क्रिस्पी, कुरकुरीत.

How to make crispy fried paneer : पनीर क्रिस्पी, कुरकुरीत राहण्यासाठी मास्टरशेफ पंकज यांनी सांगितलेली टीप लक्षात ठेवू. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 07:06 PM2023-02-03T19:06:58+5:302023-02-03T19:15:13+5:30

How to make crispy fried paneer : पनीर क्रिस्पी, कुरकुरीत राहण्यासाठी मास्टरशेफ पंकज यांनी सांगितलेली टीप लक्षात ठेवू. 

How to make crispy fried paneer? A simple tip, paneer will remain crispy, crunchy. | ग्रेव्हीत पनीर घालत्यावर मऊ पडते? एक सोपी टीप, पनीर राहील क्रिस्पी, कुरकुरीत.

ग्रेव्हीत पनीर घालत्यावर मऊ पडते? एक सोपी टीप, पनीर राहील क्रिस्पी, कुरकुरीत.

पनीर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का असे पनीरपासून अनेक पदार्थ तयार करता येऊ शकतात. भारतीय पदार्थांसोबतच आजकाल चायनीज पदार्थांमध्ये देखील पनीरचा वापर केला जातो. पनीर ६५, पनीर क्रिस्पी असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात.

पनीरची भाजी किंवा पनीर पासून काही चायनीज पदार्थ बनवायचे झाल्यास आपण पनीरला क्रिस्पी बनवण्यासाठी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून मग ते तळून घेतो. परंतु असे केल्यास काही कालांतराने हे क्रिस्पी पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यावर ते मऊ पडते. यामुळे पनीरचा क्रिस्पीपणा निघून गेल्यामुळे ती डिश खाण्याचा मूड निघून जातो. अशावेळी पनीर क्रिस्पी, कुरकुरीत राहण्यासाठी मास्टरशेफ पंकज यांनी सांगितलेली टीप लक्षात ठेवू. यामुळे तुमचे पनीर ग्रेव्ही मध्ये घातल्यावर देखील कुरकुरीत राहील(How to make crispy fried paneer).

 

नक्की काय करता येऊ शकत? 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये प्रत्येकी दोन टेबलस्पून मैदा व कॉर्नफ्लॉवर घ्यावे. 
२. त्यानंतर मसाल्यांनी मॅरीनेट केलेल्या पनीरवर हे मैदा व कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण भुरभुरवून घ्यावेत. 
३. आता त्या सगळ्या पनीरच्या तुकड्यांना मैदा व कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लागेल असे टॉस करून घ्यावेत. 
४. मग दुसऱ्या बाऊलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात हे टॉस करून घेतलेले पनीरचे तुकडे एक एक करून लगेच पाण्यात बुडवून पटकन बाहेर काढावे. 

५. आता पनीरचे सगळे तुकडे पाण्यातून हलकेच बुडवून घेतल्यानंतर परत त्यावर मैदा व कॉर्नफ्लॉवर यांचे मिश्रण भुरभुरवून घ्यावेत.
६. त्यानंतर गरम तेलांत हे पनीरचे तुकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत. 
७. आता हे पनीरचे तुकडे तळून झाल्यावर ग्रेव्हीत सोडावे. 

या टीपचा वापर केल्यास ग्रेव्हीतील पनीर मऊ न पडता तसेच क्रिस्पी राहील.   

मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या masterchefpankajbhadouria इंस्टाग्राम पेजवरून पनीर क्रिस्पी कसे करायचे याबाबत एक खास टीप शेअर केली आहे.

Web Title: How to make crispy fried paneer? A simple tip, paneer will remain crispy, crunchy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.