Join us  

गरमागरम इडली सांबार तर खाताच आता खाऊन पाहा इडली पकोडा, पावसाळ्यात खा नव्या पद्धतीची भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 5:38 PM

how to make crispy idli pakoda using left over idli इडली आवडत असेल तर हा इडली पकोडाही आवडेल

अनेक लोकं नाश्त्याची सुरुवात इडलीने करतात. इडलीसोबत चटणी आणि सांबार असेल, तर टेस्टी आणि पोटभर नाश्ता होतो. इडली करण्यासाठी मोठी प्रोसेस जरी असली तरी, काही लोकं शॉर्टकट इन्स्टंट इडली तयार करतात. अनेकदा इडली उरते, इडली गार झाल्यानंतर कोणी खात नाही. इडली गरम असतानाच छान लागते.

जर इडली उरली असेल व, शिळी इडली खायची नसेल, तर त्याची भजी तयार करा. इडली पकोडा घरच्या साहित्यात तयार होते, व झटपट बनते. भजीमध्ये देखील अनेक प्रकार आहेत, जर आपल्याला त्याच भजीचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर, इडली पकोडा ही रेसिपी नक्की करून पाहा(how to make crispy idli pakoda using left over idli).

इडली पकोडा करण्यासाठी लागणारं साहित्य

इडली

सिमला मिरची

कोबी

गाजर

कोथिंबीर

हिरवी मिरची

जिरं

आलं - लसूण पेस्ट

धणे पूड

हळद

पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील

मीठ

लाल तिखट

बेसन

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊल इडली घ्या, व हाताने इडली कुस्कुरून घ्या. त्यात एक कप बारीक चिरलेली सिमला मिरची, एक कप बारीक चिरलेला कोबी, एक कप बारीक चिरलेला गाजर, एक कप कोथिंबीर, ४ ते ५ बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ चमचे जिरं, आलं - लसूण पेस्ट, एक चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, व एक कप बेसन घालून साहित्य एकजीव करा. त्यात आपण गरजेनुसार पाणी देखील घालू शकता.

पावसाळ्यात सुकं खोबरं काळं पडतं, खवट होतं? ४ टिप्स- खोबरं टिकेल मस्त

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार बॅटरचे छोटे गोळे घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे इडली पकोडा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स