Join us  

विकतसारखी कुरकुरीत कांदा भजी आता करा घरीच आणि झटपट, पाहा भजींची खमंग रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 2:11 PM

How to make crispy kanda bhaji : कुरकुरीत कांदा भजी बनवणं खूपच सोपं आहे. (Kanda Bhaji Pyaz ke Pakode Recipe) त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची अजिबात गरज नाही.

पावसाळ्यात गरमागरम चहाबरोबर कांदा भजी खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. कांदा भजीचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यावर खाण्यासाठी भजी हा उत्तम पर्याय आहे. पण पावसाळ्यात बाहेरचं खाणं लोक टाळतात. (Kanda Bhaji Recipe) कारण बाहेरचं खाल्ल्यानं फूड पॉजनिंगमुळे पोटाचे त्रास उद्भवू शकता. घरच्याघरी कांदा भजी बनवणं अगदी सोपं आहे. (Cooking Hacks & Tips) 

कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी जास्तवेळही लागणार नाही (Kanda Bhaji Pyaz ke Pakode Recipe) त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची अजिबात गरज नाही. या भजीला खेकडा भजी असंही म्हणतात. भजी करताना पीठ आणि पाण्याचं प्रमाण चुकलं तर या भजीचा टेक्सचर बदलतो आणि चव येत नाही. भजी कुरकुरीत बनवण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी पाहूया. (How to make kanda bhaji)

साहित्य

पातळ लांब चिरलेले कांदे - २ ते ३

हिरवी मिरची - २ 

काश्मिरी लाल तिखट - अर्धा टिस्पून

जिरं पावडर - अर्धा टिस्पून

धणे पूड - अर्धा टिस्पून

आमचूर पावडर - अर्धा टिस्पून

ओवा - १ टिस्पून

बेसन - १ कप

तांदळाचं पीठ -  अर्धा कप

मीठ - चवीनुसार

तेल

पाणी

कृती

१) कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याची सालं काढून लांब बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड, आमचूर पावडर आणि ओवा घाला. 

२) आता त्यात १ कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. अनेकदा कांद्याला पाणी सुटते. जर काद्याला पाणी सुटले तर  नसेल तर थोडं पाणी मिसळून मिश्रण एकत्र करा. मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

३) गॅसवर कढई ठेवा. गॅसवर कढई ठेवा. कढईत तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यानंतर, त्यात भजीच्या पीठाचे तयार पीठ हाताने छोटे छोटे गोळे करून सोडा. भाज्यांना गोल्डन ब्राऊन रंग येउपर्यंत तळून घ्या. कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी तयार आहे. ही भजी तुम्ही सॉस, ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न