Lokmat Sakhi >Food > क्रिस्पी - कुरकुरीत भजी खायची आहेत? ५ टिप्स, १० मिनिटांत भजींची डिश हातात

क्रिस्पी - कुरकुरीत भजी खायची आहेत? ५ टिप्स, १० मिनिटांत भजींची डिश हातात

How to Make Crispy Pakoda at Home : भजी बिघडली तर मूड जातो, कुरकुरीत भजी खायची तर करा ४ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:08 PM2023-07-12T15:08:54+5:302023-07-12T16:31:13+5:30

How to Make Crispy Pakoda at Home : भजी बिघडली तर मूड जातो, कुरकुरीत भजी खायची तर करा ४ गोष्टी

How to Make Crispy Pakoda at Home : How to Make Pakora More Crispy | क्रिस्पी - कुरकुरीत भजी खायची आहेत? ५ टिप्स, १० मिनिटांत भजींची डिश हातात

क्रिस्पी - कुरकुरीत भजी खायची आहेत? ५ टिप्स, १० मिनिटांत भजींची डिश हातात

पावसाळ्यात लोकांना क्रिस्पी, चटपटीत खाण्याची इच्छा होते अशावेळी बाहेरचे वडे, भजी हे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Kitchen Tips)  भजी बनवण्यासाठी पावसाळा हा परफेक्ट ऋतू असतो. चहाबरोबर  कुरकुरीत कांदाभजी, मूग भजी तर नाश्त्याला बटाटभजी किंवा बटाटे वडी खाण्याचा मोह आवरला जात नाही. (Cooking Hacks)  घरात बनवलेले वडे, भजी कुरकुरीत होत नाहीत. जास्त तेल पितात अशी अनेकांची तक्रार असते. (How to make crispy pakoda at home)  भजी आणि वडे तळताना ते अजिबात कुरुकुरीत होत नाही असं दिसून  येतं. कारण वातावरणातील  आद्रतेमुळे पदार्थ तेव्हढा खमंग राहत नाही. पावसाच्या दिवसातही भजी कुरकुरीत, खमंग होण्यासाठी काही सोप्या पाहूया. (How to make Perfect Pakode)

१) थंड पाण्याचा वापर करा

क्रिस्पी आणि क्रंची भजी बनवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. सगळ्यात आधी भजी बनवण्याचं पीठ घ्या आणि त्यात थंड पाणी घाला काहीवेळासाठी हे असंच ठेवून द्या. नंतर भजीचे बॅटर व्यवस्थित भिजवा. यामुळे भजी जास्त क्रिस्पी आणि क्रंची होतील.

२) पीठ व्यवस्थित फेटून घ्या

भजी बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणंसुद्धा गरजेचं आहे.  यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. भजीचं बॅटर ५ ते १० मिनिटांसाठी व्यवस्थित फेटा जेणेकरून भजी सॉफ्ट आणि क्रिस्पी बनतील. 

३) तळताना तेलात चमचा घालू नका

भजी तळताना कढईत सतत चमचा हलवू नका. यामुळे भजी क्रिस्पी होत नाहीत आणि लगेच मऊ पडतात. भजी तेलात टाकल्यानंतर जास्तवेळा चमचा न फिरवता गरज लागेल तेव्हाच कढईत चमचा घाला.

४) भाज्या धुतल्यानंतर सुकवून घ्या

जेव्हा तुम्ही पालक किंवा इतर कोणत्याही पदार्थाची भजी बनवता तेव्हा ती भाजी धुतल्यानंतर त्यात लगेचच बॅटरमध्ये घालू नका. भाज्या व्यवस्थित पुसून मग पिठात मिसळा. जर मीठ लावल्यामुळे भाज्यांना पाणी सुटत असेल तर ते पाणी आधी वेगळं करा. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भाज्या सर्व प्रथम सुती कापडानं पुसून घ्या नंतर पंख्याच्या हवेत वाळवा मग पीठात मिसळा.

Web Title: How to Make Crispy Pakoda at Home : How to Make Pakora More Crispy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.