Join us  

धो - धो कोसळणाऱ्या पावसात खा गरमागरम पनीर फिंगर्स, खा चमचमीत-रेसिपी एकदम सोपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 9:15 PM

How To Make Crispy Paneer Finger At Home : खिडकीतून बाहेर कोसळणाऱ्या पावसाळा बघून काहीतरी गरमागरम चटपटीत खाण्याची इच्छा होते. करा पनीर फिंगर्स

कुठल्याही रेटॉरंटमध्ये गेल्यावर जेवणाच्या आधीची स्टार्टर डिश म्हणून पनीरलाच पसंती दिली जाते. स्टार्टर डिश मधील पनीर म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. पनीरचे असंख्य पदार्थ बनवले जातात. जेवणामध्ये स्टार्टर पासून ते मेन कोर्सपर्यंत सगळ्याच गोष्टीत पनीरचा वापर केला जातो. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. पनीरचे स्टार्टर खाण्यात मज्जा काही औरच असते. 

पनीर ६५, पनीर चिली, पनीर कोफ्ता, पनीर लाबाबदार, पनीर टिक्का असे पनीरचे अनेक प्रकार स्टार्टरमध्ये नक्कीच खाल्ले असतील. पनीर हा एक असा पदार्थ आहे की त्याला कोणत्याही मसाल्यांमध्ये घोळवले की तो त्याची चव घेऊन अधिक स्वादिष्ट लागतो. स्टार्टरमध्ये आपण पनीरचे वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी बनवू शकतो. पनीर फिंगर्स हा त्यापैकीच एक खास पदार्थ आहे. आता आपण घरच्या घरी देखील पनीरचे झटपट होणारे स्टार्टर बनवू शकतो. बाहेर धो - धो पाऊस कोसळत असताना घरात बसून चटपटीत पनीर फिंगर्स खाण्याचा आनंद लुटा(How To Make Crispy Paneer Finger At Home).  

साहित्य :- 

१. पनीर - २०० ग्रॅम २. बेसन - १/२ कप ३. तांदुळाचे पीठ - १/२ कप ४. मीठ - चवीनुसार ५. ओवा - १ टेबलस्पून ६. आलं व लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ८. हळद - १ टेबलस्पून ९. पाणी - गरजेनुसार १०. तेल - २ ते ३ टेबलस्पून ११. काळे तीळ - १ टेबलस्पून १२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १३. ब्रेड क्रम्स - १ टेबलस्पून १४. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून 

काही केल्या इडल्या फुगून येत नाहीत ? वापरा झटपट सोप्या टिप्स... इडली फुगेल पुरीसारखी टम्म...

कृती :- 

१. सर्वप्रथम पनीरचे उभे लांब आकाराचे तुकडे कापून घ्यावे. हे तुकडे कापून बाजूला एका डिशमध्ये ठेवून द्यावेत. २. आता एका मोठ्या बाऊलमध्ये, बेसन, तांदुळाचे पीठ, मीठ, ओवा, आलं व लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, हळद व गरजेनुसार पाणी घालून त्याचे पातळ कोटिंग बनवून घ्यावे. ३. हे कोटिंग बनवून झाल्यावर त्यात पनीरचे कापून घेतलेले तुकडे घालावेत, या पनीरच्या तुकडयांना हे कोटिंग व्यवस्थित लावून कोट करून घ्यावे. 

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

उरलेल्या इडलीची करा चिली इडली, पदार्थ देशी - चव चटपटीत चायनीज...

४. आता एका डिशमध्ये, ब्रेड क्रम्स, चिली फ्लेक्स, काळे व पांढरे तीळ घालून हे सगळे जिन्नस एकत्रित करून छान कोटिंग तयार करून घ्यावे. ५. बेसनाच्या कोटिंगमध्ये बुडवून घेतलेले पनीरचे तुकडे आता ब्रेड क्रम्सच्या तयार केलेल्या कुरकुरीत कोटिंगमध्ये घोळवून घ्यावे. ६. त्यानंतर आपण हे पनीरचे फिंगर्स तेलात तळू शकता किंवा किंवा एअर फ्रायरमध्ये देखील कमी तेलात तळून घेऊ शकता. 

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

आता आपले पनीर फिंगर्स खाण्यासाठी तयार आहेत चटणी किंवा सॉससोबत हे पनीर फिंगर्स खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती