दाक्षिणात्य पदार्थ (South Indian Food) कुरकुरीत डोसा (Crispy Dosa) फक्त साऊथमध्ये नसून, महाराष्ट्रातही तितकाच फेमस आहे (Cooking Tips). क्रिस्पी डोसा खाण्यासाठी आपण खास अण्णाच्या ठेल्यावर किंवा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जातो. अनेकदा आपण घरातही कुरकुरीत डोसा करण्याचा प्रयत्न करतो. पण डोसा करताना कधी तव्याला चिकटतो किंवा फाटतो.
क्रिस्पी डोसा करण्यासाठी आपण घरी नॉन स्टिक तवाही विकत आणतो. पण घरात नॉन स्टिक तवा उपलब्ध नसेल किंवा नॉन स्टिक तवा खराब झाला असेल तर? अशावेळी डोसा नेमका कोणत्या तव्यावर करायचा? असा प्रश्न निर्माण होतो. कारण करपलेला - फाटलेला डोसा खायला कुणालाच आवडत नाही. नॉन स्टिक तव्यावर क्रिस्पी डोसा नेमका कसा करायचा? पाहा सोपी रेसिपी(How to Make crispy paper thin dosas in cast iron pan).
नॉन स्टिक तव्याव्यतिरिक्त डोसा नेमका कशात बनवायचा?
- जर घरात नॉन स्टिक तवा उपलब्ध नसेल किंवा खराब झाला असेल तर, आपण लोखंडी तव्याचाही वापर करू शकता. लोखंडी तवा सहसा घराघरांमध्ये उपलब्ध असतो. पण लोखंडी तव्यावर शक्यतो डोसा चिकटतो. अशावेळी याचा वापर डोसा करण्यासाठी कसा करावा?
- डोसा करण्यासाठी लोखंडी तवा नॉन-स्टिक बनवायचा असेल तर, प्रथम तवा धूर येईपर्यंत गरम करा. गॅस मंद आचेवर ठेवून संपूर्ण तव्याला तेल लावा. नंतर त्यावर थोडे मीठ शिंपडा. मीठ शिंपडल्यानंतर त्यावर पाणी देखील शिंपडा. नंतर कपड्याच्या मदतीने पॅन पुसून घ्या. गॅस बंद करा आणि पॅन थंड होऊ द्या आणि १० मिनिटांनी गॅस चालू करा आणि वाटीभर डोश्याचं बॅटर पसरवा.
हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ
- आता गॅसची फ्लेम वाढवा. चमच्याने डोश्याच्या भोवतीने छोटा चमचाभर तेल ओता. नंतर उलाथन्याने पलटवून डोसा दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. अशा पद्धतीने लोखंडी तव्यावर कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.
- तव्याला तेल लावण्यासाठी आपण कांद्याचाही वापर करू शकता. कांदा तेलात बुडवून तव्यावर तेल लावल्याने डोसा खूप कुरकुरीत होतो.
लोखंडी तवा वापरण्याचे काही टिप्स
- पॅन विकत घेताना लक्षात ठेवा की त्यात हँडल देखील असले पाहिजे कारण हँडलशिवाय गरम पॅन उचलणे आणि ठेवणे खूप कठीण आहे.
डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट
- डोसा करण्यासाठी लोखंडी तवा कधीही जास्त साबणाने धुवू नका, फक्त कोमट पाण्याने स्वच्छ करणे हाच उत्तम पर्याय आहे.