Join us  

हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 11:13 AM

How to Make Crispy South Indian Style Paper Dosa डोसे मऊ होतात? करताना पॅनवर चिटकतात? क्रिस्पी पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत पाहा.

सध्या अनेक जण नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहेत. साऊथ इंडियन पदार्थ चवीला तर भन्नाट लागतातच, यासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा, अप्पे हे पदार्थ खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

डोश्यामध्ये अनेक प्रकार केले जातात. ज्यात पेपर डोसा खवय्या वर्गामध्ये खूप फेमस आहे. डोश्याचं नाव जरी हटके असलं, तरी चवीला कुरकुरीत लागते. पण घरी हॉटेलस्टाईल पेपर डोसा तयार होत नाही. त्याला क्रिस्पीनेस येत नाही, डोसे मऊ होतात. जर आपल्याला हॉटेलस्टाईल पेपर डोसा घरी तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा(How to Make Crispy South Indian Style Paper Dosa ).

पेपर डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

मेथी दाणे

उडीद डाळ

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

मीठ

बटर

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ४ कप तांदूळ, एक चमचा मेथी दाणे आणि पाणी घालून धुवून घ्या. पुन्हा त्यात ३ कप पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी तांदूळ भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप उडीद डाळीमध्ये पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात एक कप पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात पाणी वगळून भिजलेले तांदूळ घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात भिजलेली उडीद डाळ घालून त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट तांदुळाच्या बॅटरमध्ये मिक्स करा.

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून, हाताने एकजीव करा. पीठ आंबवण्यासाठी रात्रभर किंवा ५ ते ६ तासांसाठी झाकण झाकून ठेवा. ५ तास झाल्यानंतर पीठ चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर तेल किंवा बटर लावून ग्रीस करून घ्या. गॅसची फ्लेम हाय ठेवा. व चमच्याने पीठ पसरवा. डोश्याची लेअर बारीक ठेवा. जेणेकरून डोश्याला क्रिस्पीनेस येईल. डोश्याच्या वरच्या बाजूस बटर लावा, व दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. अशा प्रकारे हॉटेल स्टाईल क्रिस्पी पेपर डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा सांबार, चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स