Lokmat Sakhi >Food > खुसखुशीत खमंग बाकरवडी करा घरीच! उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी स्पेशल खाऊ करा मुलांच्याच मदतीने!

खुसखुशीत खमंग बाकरवडी करा घरीच! उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी स्पेशल खाऊ करा मुलांच्याच मदतीने!

how to make bhakarwadi at home: bhakarwadi recipe for kids: summer snack ideas India: homemade bhakarwadi tips: अगदी काही वेळात बनेल खमंग बाकरवडी. नाश्त्याला किंवा चहासोबत खाता येईल. प्रमाणही अगदी अचूक राहिल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 19:59 IST2025-04-17T19:54:09+5:302025-04-17T19:59:07+5:30

how to make bhakarwadi at home: bhakarwadi recipe for kids: summer snack ideas India: homemade bhakarwadi tips: अगदी काही वेळात बनेल खमंग बाकरवडी. नाश्त्याला किंवा चहासोबत खाता येईल. प्रमाणही अगदी अचूक राहिल.

how to make crispy, spicy bhakarwadi at home summer special recipe for kids evening snack time tips for bhakarwadi Stuffing | खुसखुशीत खमंग बाकरवडी करा घरीच! उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी स्पेशल खाऊ करा मुलांच्याच मदतीने!

खुसखुशीत खमंग बाकरवडी करा घरीच! उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी स्पेशल खाऊ करा मुलांच्याच मदतीने!

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले सतत बाहेर खेळत असतात. जास्त प्रमाणात शरीराची हालचाल झाल्यामुळे त्यांना सतत तहान आणि भूक लागते. अशावेळी त्यांना भाजी-पोळी खाण्याचा कंटाळा येतो.(easy evening snacks for children) सतत काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य देखील बिघडते.
आपण घरीच मुलांसाठी काही चटपटीत- खमंग पदार्थ बनवले तर त्याची भूक देखील भागेल आणि आरोग्यही बिघडणार नाही.(homemade bhakarwadi tips) बाकरवडीची सोपी, झटपट रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. अगदी काही वेळात बनेल खमंग बाकरवडी.(crispy bhakarwadi recipe step by step) नाश्त्याला किंवा चहासोबत खाता येईल. प्रमाणही अगदी अचूक राहिल.(how to make perfect bhakarwadi roll) पाहूया सोपी आणि स्वादिष्ट बाकरवडी बनवण्याची पद्धत (traditional Indian tea time snacks for kids)

गोड-रसाळ खरबूज ओळखण्याची एक खास ट्रिक सांगतात शेफ पंकजा, खरबूज निघेल मस्त गोड

साहित्य 

आवरणासाठी 

मैदा - २ कप 
बेसन- १/४ कप
तांदळाचे पीठ - ३ चमचे
मीठ- चवीनुसार 
ओवा- १/४ चमचे
तेल - ३ चमचे 
पाणी (पीठ भिजवण्यासाठी) अंदाजे ३/४ कप 

पारंपरिक पद्धतीचं आंबट-गोड कैरीचं लोणचं! ५ टिप्स- वर्षभर टिकेल, बुरशीही लागणार नाही...

बाकरवाडीचे सारण बनवण्यासाठी 

धणे - १ चमचा 
जिरे - १ चमचा
बडीशेप - १ चमचा  
खसखस - १ चमचा 
पांढरे तीळ - २ चमचे
सुक्या खोबऱ्याचा किस- १/२ कप 
कोथिंबीरीचे पाने- १/४ कप  
बेडगी मिरची पावडर- १ चमचा 
गरम मसाला पावडर - १ चमचा 
साखर - २ चमचे 
आले लसूण पेस्ट - १ चमचा 
मीठ- चवीनुसार 
मोरा शेव- १/२ कप 
चिंच गुळाची चटणी- गरजेप्रमाणे 
तेल -तळण्यासाठी 

">
कृती 

1. सगळ्यात आधी पॅन तापत ठेवून त्यात धणे, बडीशेप आणि जिरे मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात तीळ आणि खसखस भाजून घ्या. सर्व साहित्य काढून घ्या. 

2. आता त्याच पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर पॅन स्वच्छ करुन त्याक कोथिंबिरीची पाने घालून मंद आचेवर परतवून घ्या. आणि भाजलेल्या खोबऱ्याच्या किसमध्ये घाला. 

3. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले मसाले जाडसर वाटून घ्या. आता त्यामध्ये किसलेले खोबरे आणि २ चमचे शेव किचिंत वाटून घ्या. त्यात साखर, आले-लसूण पेस्ट, मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि चवीपुरता मीठ घाला. एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. 

4. आता मसाला ताटात काढून त्यात शेव घालून हाताने बारीक करा. त्यात चिंच गुळाची चटणी घालून हाताने मिक्स करा. बाकरवडीचे सारण तयार होईल. 

5. एका भांड्यात  मैदा, बेसन, तांदळाचे पीठी, मीठ आणि ओवा घालून मिक्स करा. त्यानंतर तेल कडकडीत तापवून घ्या. तेलाचे मोहन पीठात घालून चमच्याने मिक्स करा. नंतर हाताने मिक्स करुन पाण्याने पीठ मळून घ्या. पीठ मध्यम प्रमाणात मळावे. 

6. १५ ते २० मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवा. पुन्हा एकदा हाताने मळून घ्या. पिठाचे गोळे करुन घ्या. गोळा घेऊन चपातीसारखे लाटून घ्या. त्यावर एक छोटा चमचा चिंच-गूळ चटणी घाला आणि पसरवून घ्या. 

7. आता तयार मसाला यावर पसरवून प्रेस करुन घ्या. हलक्या हाताने चपातीच्या कडा दुमडून हळूहळू दाबत रोल तयार करा. पूर्ण रोलला हलक्या हाताने दाबून घ्या. 

8. सुरीने तयार रोलचे काप करा. आता दोन्ही बाजूने वडीला प्रेस करा. तेल मध्यम गरम करुन घ्या. मंद आचेवर तेलात एक-एक वडी सोडा. एकसारख्या रंगानुसार वडी तळून घ्या. तेल चांगले नितरल्यानंतर तयार होईल खुसखुशीत-खमंग बाकरवडी. 
 

Web Title: how to make crispy, spicy bhakarwadi at home summer special recipe for kids evening snack time tips for bhakarwadi Stuffing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.