Join us  

कांदा-बटाटा भजी नेहमीची, करुन पाहा खमंग आलू-कॉर्न भजी, पावसाळ्यात चमचमीत खाण्याची चंगळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 8:49 PM

How To Make Crunchy Aloo - Corn Pakora At Home : पावसाळ्यात चहा भजी तर हवीतच, घ्या खास आलू कॉर्न भजींची रेसिपी

नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या या वातावरणात काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. पावसाळ्यात पडणारा भुरभुर पाऊस, कुंद आणि गारठलेल्या वातावरणात गरमागरम, खमंग आणि चटकमटक खाण्याची मजा काही औरच असते. आपण कितीही फिटनेस फ्रीक आणि हेल्थ कॉन्शस झालो तरी भजी पाहिल्यावर आपण सगळे विसरून जातो.

पावसाळ्यात आपण शक्यतो बटाटा भजी, कांदा भजी, मुगाची भजी यांसारखे भजीचे अनेक प्रकार बनवण्यावर भर देतो. भजी तयार करताना सर्व घटकांचे योग्य मिश्रण असणे आवश्यक असते, मगच भजी कुरकुरीत, खमंग होते. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये शक्यतो आपण बाजारांत सहज विकत मिळणारे मक्याचे कणीस आवर्जून खातोच. मक्याचे कणीस खाल्ल्याशिवाय पावसाळा पूर्णच होऊ शकत नाही. मक्याचे कणीस खाण्यासोबतच आपण या मक्याच्या दाण्यांचे अनेक पदार्थ बनवतो. मक्याचे दाणे व बटाट्याचा वापर करून आपण घरच्या घरी सहज होणाऱ्या आलू - कॉर्न भजिया बनवू शकतो. झटपट आलू - कॉर्न भाजिया बनवण्याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Crunchy Aloo - Corn Pakora At Home).

साहित्य :- 

१. मक्याचे दाणे - १, १/४ कप (उकडवून घेतलेले)२. कांदा - १/४ कप (बारीक चिरलेला कांदा)३. बटाटा - १/२ कप (कच्चा किसून घेतलेला)४. बेसन - १/४ कप ५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)६. तांदुळाचे पीठ - १/४ कप ७. हिरव्या मिरच्या - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेल्या)८. हळद - १/२ टेबलस्पून ९. धणे - जिरे पावडर - १/२ टेबलस्पून १०. मीठ - चवीनुसार ११. तेल - ४ ते ५ टेबलस्पून १२. लाल - तिखट मसाला - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये उकडवून घेतलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, किसलेला कच्चा बटाटा हे सर्व जिन्नस एकत्रित करावे. २. आता या मिश्रणात बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदुळाचे पीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, लाल - तिखट मसाला, धणे - जिरे पावडर व सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालावे. ३. आता हे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावेत. 

गरमागरम वरणभात आणि तोंडी लावायला जवसाची चटणी, पावसाळ्यात ही पारंपरिक चटणी पोटाला बरी...

सायंकाळी भूक लागल्यावर विकतचे कुरकुरे-चिप्स खाऊन ॲसिडिटी वाढवता? घ्या पोह्याच्या चिवड्याची कुरकुरीत रेसिपी...

४. एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे. ५. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर या मिश्रणाच्या छोट्या - छोट्या भज्या करून त्या गरम तेलात तळण्यासाठी सोडाव्यात. ६. या भज्या संपूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात.

अस्सल कोल्हापूरी झणझणीत भडंग करण्याची पारंपरिक रेसिपी, चहासोबत भडंग आणि निवांत गप्पांचा बेत...

आता या गरमागरम भज्या सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.

टॅग्स :अन्नपाककृती