Join us

चहासोबत खाण्यासाठी करा खमंग-कुरकुरीत डाळ पापडी, इन्स्टंट -पौष्टिक -चटकदार रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:50 IST

How to make crunchy instant dal papadi :   हे डाळ पापडी बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. (Dal Papadi Recipe) हे तुम्ही संध्याकाळी चहाबरोबरही खाऊ शकता. (Crispy & crunchy tea time snack)

संध्याकाळी किंवा सकाळी चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत पदार्थ खावेसे वाटतात. 

 घरी नाश्त्याचे पदार्थ बनवले नसतील बाहेरून विकत आणण्याशिवाय पर्याय नसतो.  स्नॅक्स बनवण्याची प्रक्रिया थोडी वेळखाऊ असल्यामुळे अनेकजण घरी स्नॅक्स बनवणं टाळतात. (How to make instant dal papadi) डाळीचे इंस्टंट स्नॅक्स बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. (Dal Papadi Recipe) याला डाळ पापडी असंही म्हणतात हे तुम्ही  संध्याकाळी चहाबरोबरही खाऊ शकता. (Crispy & crunchy tea time snack)

डाळ पापडी कशी बनवायची?

- १/४  कप डाळ १५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घ्या.   भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून दळून घ्या.  एका वाडग्यात २ कप तांदळाचं पीठ घाला. त्यात ३/४ चमचे जीरं, अर्धा चमचा काळी मिरी, २ चमचे तीळ, १ चमचा मीठ आणि तेलाचं मोहन घाला. 

दही नीट लागत नाही, आंबट होतं? १ सोपी ट्रिक; विकतसारखं घट्ट, फ्रेश दही घरीच बनेल

- त्यानंतर दळलेली डाळ, मिरची, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता,  कसुरी मेथी या पीठात घाला.  पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. याचे गोळा करून एका प्लास्टीकच्या पेपरवर ठेवून हा गोळा पसरवून घ्या. नंतर गरमागरम तेलात तळून  घ्या. तयार आहे गरमागरम डाळ पापडी.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स