पिझ्झा हा पदार्थ घरातल्या छोट्या मुलांनाच आवडतो, असं मुळीच नाही. उलट घरातली मोठी माणसंही बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आवर्जून पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त करतात. बाहेर पिझ्झा खायला गेलं तर त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणूनच मग काही जणी पिझ्झा घरी करण्याचा प्रयत्न करतात. पण तो करण्यासाठी खरोखरच खूप वेळ लागतो आणि शिवाय मेहनतही लागते. म्हणूनच आता अवघ्या ५ मिनिटांत होणाऱ्या कप पिझ्झाची ही रेसिपी एकदा बघून घ्या (how to make cup pizza?). हा पिझ्झा कसा करायचा, याविषयीचा एक खास व्हिडिओ सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे (instant pizza in 5 minutes). ही रेसिपी पाहून मुलांनी पिझ्झा खाण्याची फर्माहिश केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही तो त्यांना करून देऊ शकता.(how to make bread pizza?)
झटपट पिझ्झा करण्याची रेसिपी
साहित्य
ब्रेड स्लाईस
१ टेबलस्पून बटर
प्रत्येक धुण्यात कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ पदार्थ वापरून धुवा- जुने झाले तरी रंग उडणार नाही
३ ते ४ लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून पिझ्झा सॉस
१ टेबलस्पून टोमॅटो सॉस
बारीक चिरलेली सिमला मिरची, रेड बेल पेपर, यलो बेल पेपर, कांदा
२ टेबलस्पून उकडून घेतलेले स्वीटकॉर्न
कृती
सगळ्यात आधी ब्रेडचे तुकडे करा आणि ते तवा गरम करून बटर टाकून परतून घ्या. त्याचवेळी बारीक चिरलेला लसूणही टाकावा.
यानंतर सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्या आणि टोमॅटो सॉस तसेच पिझ्झा सॉस टाकून सगळ्या भाज्या एकत्र करून घ्या.
फक्त १ बीटरुट घेऊन करा 'हा' उपाय, केस गळणं बंद होऊन काही दिवसांतच दाट- लांबसडक होतील
एका कपमध्ये सगळ्यात खाली ब्रेडचे बटर लावलेले तुकडे टाका. त्यावर सॉसमध्ये एकत्र केलेल्या भाज्या घाला.
त्यावर चीझ टाकून पुन्हा एकदा ब्रेडचे तुकडे ठेवा. ब्रेडच्या तुकड्यांवर पुन्हा एकदा भाज्या आणि भाज्यांच्यावर किसलेलं चीज घाला.
आता हा कप १ मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ब्रेक होण्यासाठी ठेवून द्या. कप मायक्रोवेव्हमधून बाहेर काढल्यानंतर तुमचा गरमागरम कप पिझ्झा तयार झालेला असेल..