Join us  

घट्ट दही घरीच लावण्याच्या ४ ट्रिक्स; परफेक्ट लागेल दही, ताक-कढी काहीही करा होईल चविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 6:41 PM

How to Make Curd At Home : दह्यात पाणीच जास्त होतं, दही जास्त आंबट होत नाही किंवा दह्यात आंबटपणा येत नाही अशी अनेकांची तक्रार असते.

जेव्हाही आपण बाजारात जातो तेव्हा आपल्या आवडीनुसार हंग कर्ड किंवा योगर्ट, ताक विकत घेतो. ऊन्हाळ्याच्या दिवसांत ताक, दही हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. (Curd Making Tips) अनेकांची तक्रार असते की ते घरी बनवलेलं दही व्यवस्थित लागत नाही किंवा दही कापता येईल घट्ट बनत नाही. (Cooking Hacks)

काही सोप्या प्रोसेस फॉलो करून तुम्ही बाजारात्या दह्याप्रमाणे घट्ट, परफेक्ट  दही बनवू शकतात.  दह्यात पाणीच जास्त होतं, दही जास्त आंबट होत नाही किंवा दह्यात आंबटपणा येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (How to make Perfect Curd At Home)

दही लावण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या आहेत?

सगळ्यात आधी दही लावण्यासाठी फुल क्रिम गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध घ्या. दूध व्यवस्थित उकळ्यानंतर ५ मिनिटं आचेवर राहू द्या. त्यानंतर थोडं थोडं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि दूध रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवा. नंतर एका वाटीत दही घ्या. दही एका चमच्याने काढून ठेवा. त्यात दूध मिसळा त्यानंतर दूध उकळून घ्या नंतर  झाकण ठेवा सकाळी दही तयार झालेलं असेल.

दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम

जर तुम्हाला कमी वेळात दही लावायचे असेल तर एका मातीच्या भांड्याला चारही बाजूंनी दही लावा. दुसऱ्या भांड्यात १ ग्लास  कोमट आणि थोडं थंड दूध, अर्धी वाटी दही मिसळून ठेवा. नंतर हळूहळू दूध दह्याबरोबर मिसळून दही मातीच्या भांड्यात घाला.  नंतर झाकून तसंच ठेवून द्या. रात्रभरात दही परफेक्ट तयार झालेलं असेल.

कॅसरोलच्या मदतीने तुम्ही कमी वेळात  दही बनवू शकता.  दही बनवण्यासाठी फुल क्रिम दूध उकळवून घ्या जेव्हा  दूध व्यवस्थित उकळेल तेव्हा त्यात २ चमचे दही मिसळा. त्यानंतर एका स्वच्छ कॅसरोलमध्ये दूध आणि दही मिसळा. त्यानंतर कॅसरॉलचे झाकण घट्ट बंद करा. त्यावर मोठा टॉवेल ठेवा.  दही ३ ते ४ तासांनी तयार झालेलं असेल.

मायक्रोव्हेव्हमध्ये दही लावणं एकदम सोपं आहे. यासाठी कोमट दूधात दही मिसळा आणि एका भांड्यात ठेवा. जेव्हा मायक्रोव्हेट प्रीहीट होईल तेव्हा आत वाटी ठेवू द्या. मायकोव्हेव्ह बंदच राहू  द्या २ ते ३ तासांनी तुम्हाला दिसेल की दही व्यवस्थित लागले आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स